यवतमाळ सामाजिक

तालुकास्तरीय शिक्षण परिषद तथा एक दिवसीय इंग्रजी कार्यशाळेला उत्स्पूर्थ प्रतिसाद

तालुकास्तरीय शिक्षण परिषद तथा एक दिवसीय इंग्रजी कार्यशाळेला उत्स्पूर्थ प्रतिसाद

‘सुलभतंत्रांच्या मदतीने विद्यार्थी लवकर शिकतात’ डॉ.मैनाक घोष मुख्य कार्यकारी अधिकारी. जि. प.यवतमाळ

एक दिवसीय तालुकास्तरीय शिक्षण परिषद तथा इंग्रजी विषयाची कार्यशाळेचे आयोजन दिनांक २९ ऑगस्ट २०२३ ला स्थानिक गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस येथे करण्यात आले होते. प्राथमिक स्तरातील विद्यार्थ्यांकरिता इंग्रजी विषयाच्या अध्ययनाची सुलभतंत्रे यावर श्री गजानन बोढे शिक्षक, पंचायत समिती भद्रावती जिल्हा चंद्रपूर यांनी संपूर्ण दिवसभर दोन सत्रात मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे उदघाटण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले . याप्रसंगी त्यांनी अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण कार्यशाळांची जि. प.शिक्षकांकरिता अत्यत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले . कार्यशाळेच्या दरम्यान प्रशांत गावंडे प्राचार्य, डायट यवतमाळ यांनी भेट दिली व जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा चांगला असून इंग्रजी विषयाच्या अध्ययन अध्यापनासाठी नवनवीन सुलभ तत्रांच्या वापराकडे शिक्षकांचे लक्ष वेधले. यावेळी प्रकाश नगराळे गटशिक्षणाधिकारी वणी, श्रीमती आबेदा बेगम प्राचार्या गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस, मुकेश कोंडावार, गटशिक्षणाधिकारी दिग्रस, श्रीमती शुभदा पाटील विस्तार अधिकारि दिग्रस,श्री सुभाष धवसे विस्तार अधिकारी हे उपस्थित होते.

दरम्यान भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्यांवर चर्चा करण्यात आली. बदलत्या काळानुसार भविष्यवेधी शिक्षणाची आवश्यकता प्रतिपादित करून या सहा पायऱ्यांवर काम केल्यावर यश मिळू शकते हे स्पष्ट करण्यात आले. यावर श्री सुरेश बाहेकर, नितीन साबळे, श्रीमती धरती आटे यांनी आपले विचार मांडले. शेवटच्या टप्प्यात आदर्श शिक्षिका श्रीमती कविता इंगोले व श्रीमती ऋजुता महींद्रे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री मुकेश कोंडावार गटशिक्षण अधिकारी दिग्रस यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश दुधे केंद्रप्रमुख यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री हेमंत दळवी केंद्रप्रमुख यांनी केले. कार्यशाळेत श्रीमती ऋजूता महिंद्रे यांनी चितारलेले समर्पक वारली चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी पवन महिंद्रे, प्रवीन महल्ले,अरूण चिद्दरवार, संतोष बेलगमवार, सतीश बुटले, सुशील खांदवे,बंडू खडसे,मो. सईद, कु.वैशाली गावंडे, कु.पल्लवी ठाकरे, कु.सुरेखा अस्वार आणि समग्र शिक्षा आणि गुरुकुल शाळेचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Copyright ©