यवतमाळ सामाजिक

मानवता मंदिराची कार्यकारिणी जाहीर

मानवता मंदिराची कार्यकारिणी जाहीर

यवतमाळ :- श्री गुरुदेव सेवा मंडळ, नोंदणी क्रमांक एफ-२४३४,जिल्हा प्रचार समिती, मानवता मंदिर, शिवनेरी सोसायटी, यवतमाळ येथील मुख्य कार्यकारिणी व विविध कार्य समित्यांची निवड सन २०२३- २०२८ करिता करण्यात आली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व प्रचार व्हावा तसेच मानवी समाजात भूतदया, बंधुप्रेम, राष्ट्रभक्ती निर्माण व्हावी हाच दृष्टिकोन समोर ठेवून ‘ मानवता मंदिर ‘ येथे एकमुखाने सर्व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

मुख्य कार्यकारिणी अध्यक्ष – डॉ. सूर्यप्रकाश जयस्वाल, उपाध्यक्ष – संजय भुयार, सचिव – विजय इंगोले, सहसचिव – सौ. कविता अमोल बोदडे, , कोषाध्यक्ष – डॉ.अशोक पुनसे ,महिला प्रमुख – सौ. कविता अनंत सूर्यकार, संचालक – नामदेव राजुरकर, बजरंग शेंडे, अशोक गेडाम, निमंत्रित सदस्य – डॉ.अनंतकुमार सूर्यकार, रामदास घंगाळे.

ज्येष्ठ सल्लागार समिती – अरुणदादा सालोडकर, विनायक बोदडे, सुदर्शन बेले, अशोक ठाकरे, प्रभाकर ढोले, रमेश महामुने, अशोक बोदडे,सौ. लता किरपान.

भजन प्रभाव समिती अध्यक्ष – डॉ.अनंतकुमार सूर्यकार, उपाध्यक्ष – बजरंग शेंडे, सचिव – रामदास घंगाळे, कोषाध्यक्ष – तुकाराम राऊत, सदस्य – डॉ. नरेश घोडमारे, नामदेव राजुरकर, रमेश नारनवरे, अशोक गेडाम, प्रभाकर ढोले, विजय इंगोले, दिपक कवळकर, अतुल तातावार, संजय माकोडे, लक्ष्मण राऊत, अरूण देशमुख, वाल्मिक बेलसरे व वासुदेव राठोड .

निवड प्रक्रिया मावळते अध्यक्ष विनायक बोदडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सर्व पदाधिकाऱ्यांना अशोक ठाकरे यांनी मार्गदर्शन करून सर्वांचे अभिनंदन केले. संजय भुयार यांनी आभार मानले.अरुणदादा सालोडकर यांनी गुरुदेव विचार प्रणालीनुसार सर्वांना शपथ दिली व राष्ट्रवंदनेनी निवड प्रक्रियेची सांगता झाली.

Copyright ©