महाराष्ट्र सामाजिक

ब्रम्हा कुमार प्रमोद बोडखे यांचा अभीष्टचिंतन सोहळा ब्रम्हा कुमारीज विश्वविद्यालयाने केला साजरा

अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड

ब्रम्हा कुमार प्रमोद बोडखे यांचा अभीष्टचिंतन सोहळा ब्रम्हा कुमारीज विश्वविद्यालयाने केला साजरा

जीवन चमत्कारीक आहे . जेव्हा मी कोण आहे ;माझा जन्म कशासाठी आहे आणि मला जीवनात काय करायचे आहे याची जेव्हा जानिव होते तेव्हा जीवन हे चांगल्यासाठीच जगाव असा मनाचा निग्रह होता .

वडील आमदार होते घरी सर्व धनसंपदा असतांना वैराग्य यावे आणि आपले समस्त जीवन उच्चविद्याविभुषीत असूनही ईश्वरीय सेवेत द्यावे इतरांनाहीईश्वराची अनुभूती व्हावी असा मार्ग दाखवावा हे महान त्यागी कार्य अकोटचे माजी आमदार रामदास बोडखे यांचे चिरंजीव प्रमोद भाई बोडखे अमरावती प्रजापती ब्रम्हा कुमारी इश्वरीय विश्वविद्यालयामार्फत करीत आहे . अत्यंत प्रामाणिक ;मीतभाषी ;गोड आवाज असल्याने गायनाचा नाद शिवबाबाचे गीत गाऊन करणारे प्रमोद भैया यांचा मंगळवारी जन्मदिवस ब्रमाकुमारीज अमरावती केंद्राला सुखद वातावरणात संपन्न झाला .केंद्राच्या मुख्य प्रशासीका राजयोग मुख्य शिक्षीका सितादिदि यांनी त्यांचा बाबा का फरीस्ता संबोधन करून त्यांचा यथोचीत ब्राम्हण परिवाराचे उपस्थीतीत सन्मान केला व त्यांना ईश्र्वरीय सेवेकरीता उदंड निरोगी लम्बी आयु करीता परमपिता शिवबाबाकडे मंगलमय प्रार्थना केली . यावेळी कुमार राजेशभाई बोंडे ;दिपक भाई घाटे ;विजूभाई जैस्वाल ;हरीष भाई अडवाणी ;बारळ साहब ;इंद्रा दिदि;योगीतादिदि;तेजलदिदि; मंगला दिदि;कस्तुरी दिदि;सुलभा दिदि अमरनाथ भाई ;पियुष भाई ;दिलीप भाई ;डॉ स्वप्नील भाई ;प्रवीण भाई यांचे सह ब्रम्हा परिवार उपस्थीत होता . मधूबनचे विख्यात राजयोग शिक्षक सुरज भाई यांनी त्यांना शुभेच्छा देत ईश्वरीय कार्य सतत घडो अशा शुभेच्छा दिल्यात तर वाशिम जिल्ह्यातफै त्यांना पीएल प्रणीत ग्रामीण पत्रकार संघाचे जीलाध्यक्ष अशोकराव उपाध्ये यांनीही त्यांच्या मंगलमय ईश्र्वरीय कार्यास शुभचिंतले .

Copyright ©