यवतमाळ शैक्षणिक

आदर्श शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

आदर्श शिक्षण महाविद्यालय, यवतमाळ येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन

स्थानिक आदर्श शिक्षण महाविद्यालय यवतमाळ येथे दिनांक 28/08/2023 रोजी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रांगोळीचे परीक्षण प्रा. डॉ.नीता राऊत व प्रा. डॉ. मनीषा क्षीरसागर यांनी केले. संपूर्ण रांगोळ्यांमधून एकूण तीन क्रमांक काढण्यात आले. आरती अमजरे हिने प्रथम पटकाविला तर द्वितीय क्रमांक अफषा बेग हिने पटकाविला तर तृतीय क्रमांक अंजली फुटाणे हिला देण्यात आला. सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक करण्यात आले. स्पर्धेकरिता एकूण 40 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Copyright ©