यवतमाळ सामाजिक

“सर्पमित्रांकडून आणखी एका दुर्मिळ सापाला जीवनदान”

“सर्पमित्रांकडून आणखी एका दुर्मिळ सापाला जीवनदान”

येथील रहिवासी मंगेश नैताम यांच्या घरी दुर्मिळ जातीचा साप आढळला त्यांच्या घरी दगडांच्या खाली साप जाऊन बसलेला असता त्यांनी एम एच 29 चे सावंगी पेरका येथील सर्पमित्र गौरव खामकर यांना फोन वरून कळविले त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून त्या सापाला पकडले व डब्बा बंद केले व गावातील लोकांना सापाविषयी थोडक्यात माहिती दिली व भयमुक्त केले.

एम एच 29 हेल्पिंग हँड्स ही संस्था वन्यजीव वाचवण्यास नेहमी कार्यरत असते मागील सात आठ वर्षापासून ही संस्था राळेगाव तालुक्यामध्ये काम करीत आहे.

राळेगाव तालुक्यामध्ये संस्थेचे 50 हून अधिक सदस्य कार्यरत आहे यात अभिजीत ससनकर, मंगेश वगैरहांडे, आदेश आडे, सिद्धांत थुल,करण नेहारे तेजस्विनी मेश्राम, शुभम एडसकर, गणेश राखुंडे, अक्षय काकडे हे नेहमी आपल्या सेवेत हजर आहे.

त्या पकडलेला सापाची माहिती संस्थेचे तालुकाध्यक्ष संदीप लोहकरे यांना देण्यात आली सापाविषयी अधिक माहिती घेतली असता प्राणीमित्र, सर्पमित्र संदीप लोहकरे सांगतात की हा साप Yellow Spotted Wolf Snake (कवड्या) पिवळा ठिपक्यांचा कवड्या प्रजातीचा दुर्मिळ साप आहे राळेगाव तालुक्यामध्ये या सापाची ही पहिलीच नोंद आहे हा साप पूर्णपणे बिनविषारी असतो संपूर्ण काळ्या रंगाच्या शरीरावर पिवळट ठिपक्यांच्या आडवे पट्टे असतात पोटाकडील भागावर पांढरे ठिपके डोळे काळे व डोक्याचा रंगही काळा असल्याने लवकर दिसत नाही या सापाची लांबी सरासरी एक फूट अधिकतम दीड फूट एवढी असते मादी जून जुलै महिन्यात एक ते चार अंडी घालते या सापाचे खाद्य जंगली पाली सरडे व काही वेळेस कीटक शहर व ग्रामीण भागातही आढळतो व पालीच्या शोधात घराजवळ येतो हा साप निशाचर शांत लाजाळू कवड्या सापाच्या तुलनेत याची संख्या खूपच कमी असल्याने क्वचितच प्रसंगी दिसतो.

साप अन्नसाखळीतील मुख्य घटक आहे त्यांना जीवनदान देणे हे आपलं कर्तव्य आहे लोकांनी सापाला न मारता स्वतःचा आणि सापाचा जीव धोक्यात घालू नये कुठलाही साप किंवा वन्यजीव धोक्यात किंवा आपल्या परिसरात आढळून आल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 ला किंवा एम एच 29 च्या राळेगाव तालुक्यासाठी 95 61 905 143 या क्रमांकाला संपर्क करणे असे आवाहन प्राणीमित्र सर्पमित्र संदीप लोहकरे यांनी जनतेला केले आहे

Copyright ©