यवतमाळ सामाजिक

पैसोसे खुशी खरेदी नही जाती ;अच्छे संस्कारोसे जीवनमे खुशी आती है !ब्रम्हा कुमारी शिवानी दीदी .

अशोकराव उपाध्ये / कारंजा लाड

पैसोसे खुशी खरेदी नही जाती ;अच्छे संस्कारोसे जीवनमे खुशी आती है !ब्रम्हा कुमारी शिवानी दीदी .

पैस्याने खुशी ;आनंद किवा चांगले स्वास्थ मिळत नाही तर चांगले संस्कार च मनाची स्थीती शक्तीशाली बनवते . त्यामुळेच जीवनात आनंद निर्मान होतो असे प्रतिपादन ब्रम्हा कुमारी शिवानी दीदी यांनी यवतमाळ येथे २५ ऑगष्ट रोजी चिंतामणी कृषी बाजार समितीच्या प्रशस्त विशाल सभा मंडपात खुशनुमा जीवन जीने की कला या विषयावर मुख्य प्रशासीका दादी प्रकाश मणी स्मृतीदिन विश्वबंधुत्व दिनाचे औचीत्याने प्रचंड जन समूदायाला संबोधन करतांना केले .

पुढे बोलतांना ब्रम्हा कुमारी शिवानी दीदी म्हणाल्या की चांगल्या संकल्पाने सृष्टी बनते . तेव्हा दुसऱ्यासाठी आपले शब्द चांगले असावे . लहान सहान बाबीने निराश होऊ नये . भीती आणि चिंता हा एक व्हायरस आहे तो सृष्टीत पसरलेला आहे .मी आता शांत स्वरुप आत्मा आहे हा मनाचा संस्कार पक्का करावा व आपली आत्मीक मनाची शक्ती राजयोग ‘मेडीटेशन ‘ सायलन्स मध्ये बसून वाढवावी . राजयोग आत्मनिर्भर बनवतो . गीता सार मधे सांगीतल्याप्रमाणे भगवान माझा साथी आहे माझ भाग्य श्रेष्ठ आहे जे ही परीस्थीती येईल ती कल्याणकारी समजून परम पित्याचे आभार मानावेत .जे आपण दुसऱ्याला देऊ तेच आपल्याकडे परत येते त्यामुळे सर्वांप्रती आपली सोच चांगली ठेवावी हेच खुशनुमा जीवन जगण्याचे गमक आहे . अगदी सुरवातीला मुख्य प्रशासीका दादी प्रकाशमणी यांचे प्रतीनेचे पुजन बीके. राजयोगी शिवानी दिदि यांनी सर्व केंद्रांच्या प्रमूख दिदिच्या उपस्थीतीत केले . त्यानंतर यवतमाळ ब्रम्हाकुमारीज केंद्राच्या मुख्य बीके .मंगला दीदी ;अमरावती केंद्राच्या मुख्य सितादीदी ;अकोला केंद्राच्या रुख मिनी दीदी ;कारंजा केंद्राच्या मालती दीदी इत्यादीनी महामहिम राष्ट्रपतीजी यांचे हस्ते नारीशक्ती पुरस्काराने सन्मानीत झालेल्या आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त राजयोग शिक्षीका ब्रम्हा कुमारी शिवानी दीदीचा भावपूर्ण सत्कार केला . यावेळी अमरावती केंद्राच्या मुख्य प्रशासीका सितादिदी ; बीके प्रमोद भाईजी बोडखे ;तुलसी भाईजी ;विजय भाई जैस्वाल ;बीके राजेशभाई बोंडे ;दिपक भाई घाटे ;कारंजासे मालती दीदी ;डॉ. निखील भाई ;दिलीप भाई ताठे ;महादेवराव ताठे ;अशोकराव उपाध्ये यांचे सह कारंजा ;अमरावती येथून मोठया प्रमाणात ब्राम्हण परीवार उपस्थित होता .पंधरा हजाराचे वर क्षमता असलेले सभागृह खचाखच भरलेले होते . उत्तम शिस्त ;शांतता व नियोजन कार्यक्रम स्थळी आयोजकाकडून पहावयास मिळाले .बीके गण तसेच पोलीस प्रशासनाकडून उत्तम नियोजनात ब्रम्हा कुमारी इश्वरीय विश्वविद्यालय यवतमाळ यांचे साथीने कार्यक्रम व्यवस्थित पार पडला .

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©