यवतमाळ सामाजिक

गांधीनगर येथुन एक लाखाच्या बकऱ्या चोरी.

गांधीनगर येथुन एक लाखाच्या बकऱ्या चोरी.

वडगांव जंगल पोलिसात तक्रार

यवतमाळ ते पांढरकवडा महामार्गावरील गांधीनगर येथुन अज्ञात चोरट्यांनी एक लाख रुपये किमतीच्या बकऱ्या चोरून नेल्याची घटना दिनांक २४ऑगस्टचे मध्यरात्री कळंब तालुक्यातील गांधीनगर येथे घडली.

गांधीनगर येथील शेतकरी संदीप कांबळे यांच्या मालकीच्या एकलाख रुपये किमतीच्या १५ नग बकऱ्या अज्ञात चोरट्यानी चोरल्याच्या घटनेने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर बकऱ्या चोरी घटने बाबतची तक्रार बकरी मालक सुमित कांबळे यांनी अंतर्गत येणाऱ्या वडगाव जंगल पोलीस स्टेशनला दिल्यावरून पोलीसांनी गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला आहे.

गांधीनगरसह परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनेत होणारी वाढ लक्षात घेता पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गांधीनगर परिसरातील जनतेकडून होत आहे.

Copyright ©