यवतमाळ सामाजिक

२४ सप्टेंबरच्या संघर्ष मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा- आयटक 

२४ सप्टेंबरच्या संघर्ष मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा- आयटक 

केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचारी विरोधी चुकीच्या धोरणामुळे व सर्वसामान्य नागरीकांच्या संबंधातील शासन निर्णयामुळे निर्माण झालेल्या असंतोषाची जाणीव करुन देण्याकरीता व सर्व समावेशक १० मागण्यांना घेवून आंदोलनात्मक भुमिका यवतमाळ जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या कृती समितीने निर्णय घेतली आहे

केंद्र व राज्य सरकारने मागील काही वर्षांमध्ये घेतलेल्या निर्णयांचा संघटीत, असंघटीत क्षेत्रातील तसेच सरकारी, निमसरकारी व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी, बेरोजगार, पेंशनर्स, शेतकरी व सर्वसामान्य नागरीकांच्या जिवनमानावर विपरीत परिणाम झाला असल्याने अशा निर्णयांमुळे समाजातील सर्वच क्षेत्रामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तसेच सर्वसामान्य नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध मुद्दयांवर राज्य सरकार तातडीने निर्णय घेण्यास तत्पर असतांना उपरोक्त क्षेत्रातील कामगार, कर्मचारी यांचे संदर्भात मात्र निर्णय घेत असतांना राज्य शासन तत्परता दाखवित नसल्याची भावना दिवसेंदिवस वृध्दिंगत होत आहे. ही बाब आपल्या निदर्शनास आणून देण्या करिता.

विविध क्षेत्रातील कामगार, कर्मचारी, बेरोजगार, शेतकरी, इत्यादी आपापल्या मागण्यांबाबत सतत पाठपुरावा करीत असतांना त्यांना केवळ आश्वासने मिळतात. त्यामुळे याबाबत जनमाणसात असंतोष निर्माण होत आहे. या असंतोषाला वाचा फोडण्यात यावी अशी मागणी यवतमाळ जिल्हयातील विविध क्षेत्रात कार्यान्वित असलेल्या 100 पेक्षा जास्त संघटनांनी एकत्रित येऊन आंदोलनात्मक भूमिका एकमुखाने घेतली आहे.

शासनाच्या नकारात्मक भुमिकेबाबत या सर्व सघटनांनी दिनांक 24 सप्टेंबर 2023 रोजी यवतमाळ येथील आझाद मैदान येथून हजारो-हजारोंच्या संख्येने “संघर्ष मोर्चा” चे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात आयटक संलग्न संघटना , एम.एस.ईले.वर्कर्स फेडरेशन , महाराष्ट्र राज्य बालवाडी-अंगणवाडी कर्मचारी युनियन, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना, महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियन उमेद कॅडर कर्मचारी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. कंत्राटीकरण रद्द करुन सर्व क्षेत्रातील कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत कायम करावे. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शालेय पोषण आहार कामगार, उमेद कॅडर कर्मचारी, अंशकालीन स्त्री परीचर , यांना व सर्व असंघटीत क्षेत्रातील कर्मचा-यांना रुपये 26000/- (रुपये सव्वीस हजार) किमान वेतन लागु करावे.या मुख्य मागण्या सह कृती समितीच्या घेतलेल्या १० मागण्या प्रत्येक कुटुंबातील जिव्हाळ्याचा हा मागण्या आहे तेव्हा या भव्य मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉ.विजय ठाकरे, कॉ.दिवाकर नागपुरे , वंदना बोंडे , सुनिता कुंभारे, माला इंगोले , रेखा मुधाने , गया सावळकर , सविता कट्यारमल , विलास ससाने , ल्याकत बी शेख , यांनी केले आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©