Breaking News यवतमाळ

वडगाव जंगल पोलिस स्टेशन अंतर्गत गांधीनगर येथे अपंग मुलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार ,आरोपीस अटक 

प्रतिनिधी प्रवीण राठोड

वडगाव जंगल पोलिस स्टेशन अंतर्गत गांधीनगर येथे अपंग मुलीवर नराधमाचा लैंगिक अत्याचार ,आरोपीस अटक 

अकोला बाजार:- एका 24 वर्षीय अपंग  मुलीवर एका 37 वर्षीय नराधमाने घरी कुणी नसल्याची संधी साधून लैंगिक अत्याचार केल्याची घटना वडगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गांधीनगर येथे दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजताच्या  दरम्यान उघडकीस आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,पीडित मुलीच्याआईने दिलेल्या  जबानी रिपोर्ट वरून आरोपी नक्षद बकाराम कळमकर (37) वर्ष राहणार गांधीनगर हा नराधम घरा शेजारी राहतो. माझे पती 25 वर्षा पासून घर सोडून गेल्याने,मी व अपंग मुलगी दोघेच घरी राहतो व तिचे पालन पोषण मोलमजुरी करून करीत आहे.

घटनेच्या दिवशी मी शेत कामासाठी शेतात गेली होती त्यामुळे अपंग  मुलगी खाटीवरच  एकटी असल्याची त्या नराधमाने संधी साधून घरात प्रवेश केला व माझ्या अपंग मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला जेव्हा हा प्रकार सुरू होता तेव्हा बारा वर्षीय माझ्या नातीनने आपल्या उघड्या डोळ्यांनी खिडकीतून    पाहिले व भयभीत होऊन घराकडे पळून गेली,जेव्हा मी कामावरून घरी आली तेव्हा माझ्या मुलीने घडलेली सर्व आपबिती बयान केली,तिला स्पष्ट बोलता येत नाही ती मुकबधिर  व दोन्ही पायाने अपंग आहे.,त्यामुळे तिच्या इशाऱ्याने व नातीन ने सांगितल्या वरून पीडित मुलीच्या आईने वडगाव पोलीस स्टेशन गाठून जबानी रिपोर्ट दिला यावरून वडगावचे ठाणेदार संजीव खंदारे यांच्या मार्गदर्शखाली पी एस आय भास्कर दरणे यांनी जबानी रिपोर्ट वरून विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून आरोपी नराधम याला अटक केली पुढील तपास वडगाव पोलीस करीत आहे.

Copyright ©