यवतमाळ राजकीय

रोशन ठाकुर यांचा म.न.से पक्षात प्रवेश

प्रतिनिधी:सागर झोरे

रोशन ठाकुर यांचा म.न.से पक्षात प्रवेश

वर्धा : जिल्ह्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे व दैनिक नमस्कार वर्धा तसेच ए.एम मराठी न्यूज चे प्रबंध संचालक व संपादक श्री. रोशन ठाकुर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर भाऊ सरायकर, मनसे वर्धा जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ पोटफोडे, मनसे विध्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ दांडेकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष नितीन भाऊ अमृतकर, मनसे वर्धा शहर अध्यक्ष कन्हैया यादव यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेतला.

 

यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष राजकुमार बावरी, तालुका उपाध्यक्ष समीर काशीकर, वर्धा तालुका उपाध्यक्ष अमजत पठाण, रुपेश कावळे, शेतकरी सेना तालुका अध्यक्ष श्याम बुरांडे व इतर कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते. वर्धेतील विविध पक्षाच्या जनप्रतिनिधी कडून ज्या प्रमाणात वर्धेच्या महत्वपूर्ण प्रश्नांवर आवाज उचलायला हवा तसा उचलल्या जात नाही म्हणून बऱ्याचअंशी विकास खोळंबून बसला आहे. अश्यावेळी मनसे हा एकमेव पर्याय आपल्यासमोर होता. यानंतर मा. राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार वर्धा जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करू असे याप्रसंगी रोशन ठाकुर यांनी सांगितले. वर्धा येथील विश्रामगृह येथे मनसेच्या वर्धा जिल्हा कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीनंतर रोशन ठाकुर यांनी मनसेत प्रवेश घेतला. मनसे राज्य उपाध्यक्ष किशोर भाऊ सरायकर यांनी मनसेचा दुप्पटा रोशन ठाकुर यांच्या गळ्यात घालून त्यांना मनसेत प्रवेश दिला. रोशन ठाकुर यांनी किशोर भाऊ सरायकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

Copyright ©