यवतमाळ सामाजिक

शेती विषयक मार्गदर्शन कार्यशाळा 

प्रतिनिधी: चेतन पवार

शेती विषयक मार्गदर्शन कार्यशाळा 

पाथ्रड देवी येथे राज्य पुरस्कृत कापुस उत्पादक वाढ व मूल्य साखळी योजनेअंतर्गत शेतकऱ्याची शेती शाळा ही प्रत्यक्ष श्री लंकेश्वर गुलाब जाधव यांच्या शेतात घेण्यात आली. त्यावेळेस कपाशीवरील गुलाबी बोंड व बोंड कळीचे निरीक्षण घेऊन तसेच कपाशी पिकावर येणारे रोग व किडी बाबत शेतकऱ्यांना मिश्र किडी व शत्रु विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच व कपाशी पिकावर फुले व पाती व बोंडामध्ये गुलाबी बोंड आलीस निरीक्षण घेऊन शेतकऱ्यांना फेरोमिन ट्रॅप लावणे तसेच लिंबोळी अर्काची फवारणी करणे विषयी माहिती दिली तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक कपाशी येणाऱ्या बोंड आळी बाबत त्यांना मार्गदर्शन केले तसेच एम आर इ जी एस फळबाग लागवड विषयी माहिती दिली भाऊसाहेब फुंडकर फळबागा लागवड विषयी शेतकऱ्यांना ऑनलाइन फॉर्म अर्धा करणे विषयी माहिती दिली. मागेल त्याला शेततळे ऑनलाईन करणे यात्रीकीकरण योजनेच्या माहिती दिली. यम आय डी एच योजनेची माहिती दिली. हाऊस पॉली हाऊस सवंधी विषयी माहिती दिली. पावर टीलर कांदाचाळ या योजने संबंधित माहिती शेतकऱ्यांना दिली. पावर टिलर 8 एचपी पेक्षा कमी, पावर टिलर 8 एचपी पेक्षा जास्त.

तसेच तुषार व ठिबक सिंचनाकरिता शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करणे याविषयी माहिती दिली. पी एम एफ सुरक्षा अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत डी आर पी कडे अर्ज ऑनलाईन करणे संबंधित माहिती दिली. वरील सर्व माहिती पाथ्रड देवी कृषी सहाय्यक यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Copyright ©