Breaking News यवतमाळ

पोलिसांच्या कमाईत,अनेकांच्या संसाराची होत आहे राख रांगोळी, दारू मटक्याची खुले आम् चालते मांदियाळी, एल सी बी.ची ही आहेत का? कमाई!

पोलिसांच्या कमाईत,अनेकांच्या संसाराची होत आहे राख रांगोळी, दारू मटक्याची खुले आम् चालते मांदियाळी, एल सी बी.ची ही आहेत का? कमाई!

कळंब शहर बनले अवैध धंद्याचे माहेरघर

कळंबः शहरातील सर्वचअवैध धंदयांना पोलिसांच्या आशीर्वादाने चांगलाच उत आल्याची चर्चा सध्या कळंब शहरात होत येथील स्थानिक पोलीस प्रशासन व एल सि बी यंत्रणा मात्र बघ्याची भुमिका घेऊन बसल्याचे चित्र दिसत आहे

कळंब शहरातील मागील काही दिवसा पासून मात्र वरली मटक्याचे मोठे रँकेट सक्रीय असुन जिल्ह्यातील एल सि बी यंत्रणा मात्र निकामीच दिसत असा सुरू स्थानिक कळंब वासीयाकडुन निघत आहे. ठरल्याप्रमाणे हप्ता मिळत असल्याने कोणीही कारवाई करीत नसल्याचे बोलले जात आहे. शहरातील घरफोडी गोवंश तस्करी जुगार वरली मटका रात्रीच्या वेळी होणारी अवैध दारू यासारखे अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे शहरातील कायदासुवस्था धोक्यात आली असुन पोलीस प्रशासन मात्र या कडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचे चित्र स्पष्ट आहे

कळंब शहर हे पुरातन काळापासून धार्मिक स्थळ असुन विदर्भाचे अष्टविनायक अशी ख्याती आहे. अशा धार्मिक नगरीत अवैध धंदेवाल्यांनी चांगले बस्तान मांडले आहे यातूनच गुन्हेगारी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

मंदिराच्या डाव्या बाजूला असलेल्या इंदिरा चौक येथे वरली मटक्याचे मोठे असल्याने वर्दळीच्या लोकांना रस्तावर गाड्या उभ्या करून मटका खेळण्यात मग्न असतात

वरली मटके वाल्यांनी तर आता नवीनच शक्कल लढवली आहे आता

तर सरळ मोबाईल फोनवर मटका घेऊन व्हँटसप द्वारे ग्राहकांच्या मोबाईल मध्ये दिला जातो

रात्रीच्या वेळी शहरातील अवैध दारू विक्रेते आपला व्यवसाय त्याचप्रमाणे रेती तस्करी मात्र राजरोस पणे सुरू आहे परिविक्षाधिन ठाणेदार दिनेश बैसाने यांना जनतेने किंवा पत्रकारांनी सांगावे तेव्हा कारवाई करणार असल्याचे भ्रमणध्वनीवरून सांगितले परंतु स्वतःहून का कारवाई करत नाही हे न समजणारे कोडेच आहे.

वरील सर्व बाबी कडे संबंधित वरिष्ठ अधिकारी व पोलीस अधीक्षक पवन बन्सोड यांनी गांर्भियाने लक्ष घालून कळंब शहरात होत असलेल्या अवैध धंदाना लगाम लावावा अशी मागणी जोर धरत आहे.

कोटः वृत्त पत्रात शहरासह तालुक्यातील अवैध व्यवसाय जोमात सुरू असल्याच्या बातम्या रोजच प्रकाशित होत असून सदर विषया संबंधीत ठाणेदार दिनेश बैसाने यांना फोनवरून अवैध धंद्यावर आळा घालण्यासाठी विचारणा केली असता पत्रकाराचे काम पत्रकार करतात बातम्या लिहीणे त्यांचे कामच असते पोलीस प्रशासनाची कार्यवाही सुरूअसुन अवैध धंद्यांचे तुम्ही माहीती द्या आम्ही ठोस कार्यवाही करू असे ठोस आश्वासन दिले

परिविक्षाधिन पोलीस अधिकारी तथा ठाणेदार कळंब दिनेश बैसाणे

Copyright ©