यवतमाळ शैक्षणिक

शंकरलाल कोठारी विद्या मंदिर यवतमाळ यांनी ऑल इंडिया 7th नॅशनल डान्स कॉटेस्ट फेस्टिवल 2023 मध्ये पटकाविला दुसरा क्रमांक 

शंकरलाल कोठारी विद्या मंदिर यवतमाळ यांनी ऑल इंडिया 7th नॅशनल डान्स कॉटेस्ट फेस्टिवल 2023 मध्ये पटकाविला दुसरा क्रमांक 

यवतमाळ – ऑल इंडिया 7th नॅशनल डान्स कॉटेस्ट फेस्टिवल 2023 मध्ये आयोजित ऑनलाईन डान्स वेस्टर्न ग्रुप गटात संपूर्ण भारतातील शाळांनी सहभाग नोंदविला यामध्ये एकुण 79 शाळांनी ऑनलाईन व्हिडिओ पाठवून सहभाग घेतला. 79 व्हिडिओ पैकी 7 डान्स व्हिडिओ ची निवड करण्यात आली. यात यवतमाळ साठी अभिमानास्पद बातमी म्हणजे शंकरलाल कोठारी विद्या मंदिर यवतमाळ मधील विद्यार्थीनींच्या व्हिडिओ ने दुसरा कमांक पटकविला.

या यशाबद्दल श्री शक्ती सेवा प्रतिष्ठान चे सचिव डॉ. अनुप कोठारी तसेच शंकरलाल कोठारी विद्या मंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना अनुप कोठारी, गुरूकुल इंग्लिश मिडीयम स्कुल च्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली अनिल चांडक, प्री-प्रायमरी हेड दुर्गा मिश्रा तसेच सुपरवायजर गणेश सोन्नर व सुषमा मुंदाणे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले.

या डान्स ची कोरिओग्राफी सचिन निरडवार सर यांनी केली व विशेष मेहनत घेतली. संस्थेचे सचिव डॉ. अनुप कोठारी सरांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©