यवतमाळ सामाजिक

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथे एक दिवसीय राखी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न 

लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालय, यवतमाळ येथे एक दिवसीय राखी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न 

स्थानिक लो.बा अणे महिला महाविद्यालय येथे कमवा आणि शिका या उपक्रमांतर्गत एक दिवसीय राखी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.दुर्गेश कुंटे उपस्थित होते. तर प्रमुख वक्त्या म्हणून इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ.कविता तातेड मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या उद्घाटक सौ. निता मानधना व सौ.कविता कोठारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्त्या प्रो. डॉ.कविता तातेड मॅडम यांनी कमवा आणि शिका या अंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करीत असताना आपल्यामधील कलागुणांचा विकास करून त्यांचे रूपांतर स्वंयरोजगारांमध्ये कशा पद्धतीने करता येतील हे विविध उदाहरणं देऊन विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉ.दुर्गेश कुंटे यांनी स्वयंरोजगाराच्या प्रेरणेतून छोटा व्यवसाय सुरू करून जास्त उत्पन्न मिळवणे,आपल्या उद्योजकतेचा विकास करणे,स्वयंरोजगारातून आपले कला,कौशल्य, कल्पकता,संधी कशा प्रकारे आत्मसात करता येईल या विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या सौ. श्रद्धा राठी यांनी विद्यार्थिनींना विविध प्रकारच्या राख्या कशा पद्धतीने बनवायच्या याचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मोनाली सलामे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.मनीषा क्षीरसागर यांनी केले तर प्रथम सत्राचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सरिता देशमुख यांनी केले तर द्वितीय सत्राचे आभार प्रदर्शन प्रा.सुवर्णा गादगे यांनी केले. कार्यक्रमाला एकूण १२० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरीता प्रिती तिवाडे, सौ. आशा महाडोळे यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©