यवतमाळ सामाजिक

साप शत्रू नाही शेतकऱ्याचा मित्र,यावर मार्गदर्शन

प्रवीण राठोड प्रतिनिधी  अकोला बाजार

साप शत्रू नाही शेतकऱ्याचा मित्र,यावर मार्गदर्शन 

नागपंचमी निमित्त सोमवार रोजी अकोला बाजार येथे एम एच २९हेल्पींग हंड्स वाईल्ड अँडवेंचर अ‍ॅण्ड नेचर क्लब या सामाजिक संस्थेमार्फत सर्प मित्रांनी कॉलेज, शाळा या ठिकाणी मार्गदर्शनपर कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांना जागृत करण्याचा आणि साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे हा कार्यक्रम घेतला.

अकोला बाजार येथील प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक चेले यांच्या परवानगीने तसेच लक्ष्मी बाई कावळे महाविद्यालय आणि के के ब्रिंग डेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये सुद्धा साप विषयी जनजागृती करण्यात आली. सर्प मित्र राजेंद्र कोयरे, शाहरुख शेख, यांनी विषारी व बिनविषारी सापा विषयी माहिती दिली. नागपंचमी हा सण आपण सापांचे धन्यवाद मानण्याकरिता साजरा करत असतो. त्याचे खाद्य दूध, लाह्या नसून उंदीर, कीटक हे आहे त्यामुळे सापा विषयी कोणतीही अंधश्रध्दा ठेऊ नका, साप वाचेल तर आपला शेतकरी वाचेल शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी. यावेळी अल्ताफ सय्यद राहुल करलुके शुभम साहारे गिरीधर शेन्दरे सुबोध स्तूल राजेंद्र मङावी या सर्प मित्रानी MH29 हेल्पींग हंड्स वाईल्ड अॕडवेंचर & नेचर क्लब यवतमाळ याच्या अस्तित्वा खाली काही शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

आश्रम शाळा

के के स्प्रिंग डेल इंग्लिश स्कूल विषारी व बिन विषारी सापा विषय माहीती दिली आणि यानीअंधश्रद्धा या विषयावर सांगितल साप चवल्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करावा कोणतीही झाड फुक करु नये

Copyright ©