यवतमाळ सामाजिक

कोणी आम्हाला शिक्षक देता का? म्हणत जिल्हा परिषद मध्ये विद्यार्थ्यानी भरविली शाळा.

कोणी आम्हाला शिक्षक देता का? म्हणत जिल्हा परिषद मध्ये विद्यार्थ्यानी भरविली शाळा.

शामभाऊ जैस्वाल यांच्या पुढाकारातून मिळाले दोन शिक्षक

गेल्या दीड वर्षांपासून अकोला बाजार येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत विद्यार्थ्यांची फरफट शिक्षकांच्या अभावी चालू होती. ग्राम पंचायत स्तरावरून, शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून जिल्हा परिषद यवतमाळ यांना वारंवार निवेदने आणि ठराव शिक्षकांसाठी दिली गेली, परंतु जिल्हा परिषद प्रशासनाकडून फक्त आश्वासनाची खैरात मिळत होती.

त्यामुळे यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक मागणीसाठी जि. प.सिओच्या कक्षात शाळा भरविली. शिक्षकांचे मागणीसाठी विद्याथ्यांनी नारे देऊन जिल्हा परिषद परिसर दनाणुन सोडले होते. उपमुख्यकार्यकारी , शिक्षणाधिकारी यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी आजच आम्हाला शिक्षक देण्यात यावे असा अट्टाहास धरला. विद्यार्थी व पालकांच्या मागणी रेट्यामुळे त्वरित दोन शिक्षकांचे नावाची ऑर्डर काढुन शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या हाती दिली. विद्यार्थ्यांच्या ही मागणी जि. प.. चे माजी उपाध्यक्ष शाम जयस्वाल यांनी यावेळी उचलून धरली.त्यांनी या शाळेत शिक्षक आजच देण्यासाठी जि प. प्रशासनाकडे मागणी रेटली आणि या मागणीला यश मिळत दोन शिक्षक मिळाले.

यावेळी सरपंच योगेश राजुरकर , उपसरपंच प्रवीण मोगरे , शाळा समिती अध्यक्ष मंजुषा कोराणे, हमीदखां पठाण , संदीप घनकर , बबन घनकर राजु मादेशवार, देवानंद मडावी , प्रकाश शेंद्रे, विजय कपाट, कांचन भवरे,शंकर कोटरंगे, अनिल कोळसकर,चिंतामण पायघण,श्याम भाऊ जैस्वाल, अनिताताई घनकर,शालिनीताई घनकर, नंदा ताई बोटरे,विद्यार्थी, पालक , महिला पालक उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यानी, जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानून शाळेत परतले.

अकोला बाजार येथील विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या लढ्याला यश मिळण्यात श्याम भाऊ जैस्वाल यांचा मोठा वाटा असल्याने कार्यकर्ते व पालकांनी आभार व्यक्त करत कौतुकाचा वर्षांव होताना दिसतो आहे.

Copyright ©