यवतमाळ राजकीय

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन

(मनसेने प्रशासनाला इशारा देत केले रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात वृक्षारोपण)

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती सर्कल मधील प्रत्येक रस्त्यावर निर्माण झालेली आहे याच अनुषंगाने मा श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते राजूभाऊ उंबरकर , मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार , मनसे जिल्हा उपाध्यक्ष विकास पवार यांच्या वतीने एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचे काम आजच्या आंदोलनातून करण्यात आलेले आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे इतके जीव घेणे आहेत की कित्तेक नागरिकांचा अपघात होऊन त्यांना त्रास सहन करावा लागत आहे म्हणून रस्त्या वरील विविध ठिकाणी खड्ड्यात वृक्षा रोपण करुन निर्लज्य प्रशासनाचा निषेध करण्यात आला या प प्रसगीमनसे तालुका अध्यक्ष गजानन खांतवे ,शहर अध्यक्ष प्रशांत गौरकर , विधार्थी सेना शहर अध्यक्ष उमेश जाधव , शहर उपाध्यक्ष संकेत दातिर , विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष कृष्ना भटकर,गणेश खुरसडे,अभिषेक गायकवाड , राजू जाधव, रवित्र चौहाण, रोमल गायवाड़,सुरेश शिंदे, अनिल मोरे ,अजय पारधी,गौरव रूडे, उदल जाधव,पीयूष राजगुरु,दिनेश चौहाण,येथील महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Copyright ©