यवतमाळ सामाजिक

उमरी येथे नागेश्वर(इंद्रशेष)मंदिरात नागपंचमी

उमरी येथे नागेश्वर(इंद्रशेष)मंदिरात नागपंचमी

कळंब : तालुक्यातील उमरी येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री नागेश्वर(इंद्रशेष)मंदिरात दि.२१ ऑगस्ट सोमवार रोजी नागपंचमी साजरी करण्यात आली.

त्यानिमित्त सकाळी११ वाजता टाळ मृदूंगाच्या गजरात श्री संत इंद्रशेष बाबांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

सर्वप्रथम पालखीची मिरवणूक श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात जाऊन ज्ञानेश्वर माऊलीचा गजर केला व पांडुरंगाची आरती करून जि.प प्राथमिक शाळा तसेच इंदिरा चौकात येऊन भजनी मंडळानी श्री संत इंद्रशेष बाबांचा जयघोष करून नागमंदिरात नागदेवतेची आरती करण्यात आली व लगेच पालखीची मिरवणूक इंद्रशेष हरी गंभीरशेष हरी असा जयघोष करीत श्री नागेश्वर(इंद्रशेष)देवस्थान येथे प्रस्थान होऊन काल्याचा अभंग व श्री संत इंद्रशेष बाबांची महाआरती,नागद्वार आरती करून,गावातील व बाहेर गावातील उपस्थित भाविकांना तीर्थ प्रसादाचे वाटप करण्यात आले.

उमरी गावातील महिलांनी मोठ्या थाटामाटात संत इंद्रशेष बाबांच्या पालखीचे स्वागत केले त्यामुळे गावातील वातावरण भक्तिमय दिसत होते.

ह्या पालखीमध्ये गुरुवर्य प पू सीताराम महाराज वारकरी महिला भजन मंडळ,श्री संत इंद्रशेष माऊली वारकरी महिला भजन मंडळ,श्री संत इंद्रशेष सेवाधारी महिला पुरुष मंडळी व नागदेवतेच्या बाऱ्यावाल्यानी बाऱ्या सादर केल्या व इंद्रशेष शिव भक्तांनी महादेवाची गाणी सादर केली होती.

Copyright ©