यवतमाळ राजकीय

आर्णी येथिल विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक संपन्न

सावळी सदोबा आसिफ पठाण 

आर्णी येथिल विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक संपन्न

तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ताचा घेतला आढावा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची बैठक दिनांक २० ऑगस्ट रविवार रोजी विश्रामगृह आर्णी येथे पार पडली.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई निकम हया होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राहुल कानारकर ,युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संकेत टोने , राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हाध्यक्ष निखिल गावंडे , ग्रंथालय जिल्हाध्यक्ष अशोक राऊत , प्रा.नलिनी चौधरी या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीमध्ये वर्षाताई निकम, राहुल कानारकर, प्रा.नलिनीताई चौधरी, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी आपले विचार मांडले.

यावेळी आर्णी तालुक्यातील सुनील पोतगंटवार जिल्हाध्यक्ष ओ.बी.सी.सेल , श्रीधर ठाकरे तालुकाध्यक्ष ओ.बी.सी.सेल,भारत काळबांडे, किसन नाईक, विनोद पवार, अरुण मेश्राम, सुनील चव्हाण, रामराव राठोड, संतोष तरोडकर, विजय राठोड, रामेश्वर चौधरी, वैभव बुटले, शुभम गरुड यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकर्ता मंडळी उपस्थित होती.

या कार्यक्रमात मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासोबत कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे राहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम यांनी यावेळी व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत काळबांडे यांनी तर प्रस्ताविक मुबारक तंवर यांनी केले आणि उपस्थितांचे आभार ओ.बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील पोतगंटवार यांनी मांडले.

Copyright ©