यवतमाळ सामाजिक

कावड यात्रेने हिवरी दुमदुमली

कावड यात्रेने हिवरी दुमदुमली

दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी कावड यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले हि कावड यात्रा माहुर ते मंदेव देवस्थान अशी पायदळ यात्रा असून महादेवाच्या जयघोषात या कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेत महिला पुरुष,तरुण,तरुणी यांचा यात मोठा सहभाग होता यात महिला व पुरुषांनी कावड खांद्यावर घेऊन पायदळ माहुर ते मंदेव प्रस्थान करण्यात आले या वेळी हिवरी येथे सर्व भाविक भक्तांना चहा नाष्टा देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले या मध्ये हिवरी, मनपुर, माळ म्हसोला,अर्जुना,किन्ही, वाट खेड, मंगरूळ वाई,येथून हाजारो भाविक भक्तांनी सहभाग घेतला होता.दहा ते बारा कावडीचा समावेश होता.

Copyright ©