यवतमाळ सामाजिक

वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने मानस कन्येचा विवाह संपन्न

वसुंधरा फाउंडेशनच्या वतीने मानस कन्येचा विवाह संपन्न

यवतमाळ -: अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेले एक नाव म्हणजे वसुंधरा फाउंडेशन यवतमाळ या फाउंडेशन मध्ये कार्यरत असलेल्या सक्रिय सदस्य माधुरी कोटेवार /चौधरी यांच्या मानस कन्येचा विवाह नुकताच जगत मंदिर येथे दिनांक १४ ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.मानस कन्या लंका सिताराम मेश्राम हिचे आंतरजातीय लग्न विवेकानंद अशोक महाजन यांच्या सोबत संपन झाले.

माधुरी कोटेवार/चौधरी यांनी तीन मुलींना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासह विवाहाची जबाबदारी काही वर्षापूर्वी स्वीकारली होती.याकरिता त्यांना वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष वर्षा पडवे यांचे सह संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.वसुंधरा फाउंडेशनच्या वर्षा पडवे लग्नाच्या वऱ्हाड्यांच्या जेवणाचा खर्च उचलला.त्याकरिता त्यांना फाउंडेशनच्या इतर पदाधिकाऱ्यांनी या विवाह नियोजनासाठी आर्थिक मदत केली.वर्षा पडवे,माधुरी कोटेवार,डॉ.नेहा पडवाळे,स्मिता ढेकळे,जया सलुजा,ॲड.प्राची निलावार,नीलम डोंगरे,कल्पना शेकदार,रुपाली हांडे, डॉ.मीनाक्षी गाढवे,वैशाली हिरे,अर्पिता पोहनकर आदी उपस्थित होते..

Copyright ©