यवतमाळ सामाजिक

ग्रामीण रुग्णालयासह दिग्रस तालुक्यातील आरोग्य (psc) केंद्रावर औषधी वाटप

ग्रामीण रुग्णालयासह दिग्रस तालुक्यातील आरोग्य (psc) केंद्रावर औषधी वाटप

पालकमंत्री संजय राठोड यांचा स्तुत्य उपक्रम.

दिग्रस :- पावसाळ्यातील साथीचे रोग पाहता कोणीही उपचारा विना वंचित राहूनये रुग्णांना सहज औषधी उबलब्ध व्हावी व त्यांचा आजार बरा व्हावा या उदात्त हेतूने या विभागाचे आमदार मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या सौजन्याने शिवसेने तर्फे ग्रामीण रुग्णालयासह दिग्रस तालुक्यातील आरोग्य केंद्रावर औषधी वाटप करण्यात आले.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ब्रीदवाक्य असलेल्या ८० टक्के समाजकारण आणी २० टक्के राजकारण या तत्वावर प्रामाणिकपणे नेहमी कार्यरत असलेले सामाजिक व सेवाभावी कार्याच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक व गरजवंताला नेहमी मदतिचा हात देणारे त्याच बरोबर नागरिकांच्या आरोग्याची काळजी पोटी आरोग्य शिबिरे, मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर त्या सोबतच नेत्र रुग्णांना चष्मे वाटप करून हजारो रुग्णांना आरोग्याचा लाभ पोहचविणारे तसेच रक्तदानाच्या माध्यमातून रुग्णांना रक्त उपलब्ध करून देणारे आरोग्य दुत म्हणून उपमा लाभलेले ना.संजय राठोड यांच्या सौजण्याने दिग्रस शिवसेनने तर्फे ग्रामीण रुग्णालय दिग्रससह तालुक्यातील आरोग्य केंद्रावर सर्व रोगावर उपयुक्त व गुणकारी असलेली औषधी वाटप करण्यात आली ही औषधी ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ वीरेंद्र अस्वार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ श्रीकृष्ण बानोत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे, या मध्ये ताप,सर्दी, खोकला,अंगदुखी, बीपी, शुगर, अँटीबायोटिक, ऍलर्जी, ऍसिडिटी, मल्टीव्हिटॅमिन आदी औषधींचा समावेश आहे, त्याचबरोबर सध्या डोळ्याची साथ सुरू असल्याने आय ड्रॉप सुध्दा शिवसेना कार्यकर्ते घरोघरी जाऊन वाटप करीत असल्याने पालकमंत्री संजय राठोड यांच्या या कार्याचे नागरिकांतून स्वागत होत आहे. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठवकर, शहर प्रमुख प्रणित मोरे, ज्येष्ठ शिवसैनिक अरविंद मिश्रा, डॉ. मनोज टेवरे, संजीव चोपडे, जॉकी राठोड, संजय कुकडी, नूर मोहम्मद खान, अजय भोयर, राहुल गाडे, दिनेश खाडे, नितीन सोनूलकर, तस्लीमभाई यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Copyright ©