यवतमाळ सामाजिक

यवतमाळ जिल्हा सर्वशाखीय माळीसमाज गुणगौरव सोहळा संपन्न

  1. यवतमाळ जिल्हा सर्वशाखीय माळीसमाज गुणगौरव सोहळा संपन्न

भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. पूर्वापार परंपरेने चालत आलेल्या प्राचीनतम शैक्षणिक वारश्याचा व अलिकडे नव्या युगाची आव्हाने स्वीकारत नव्याने तयार झालेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या भावी पिढीने आत्मनिर्भर बनावे, गुलाम बनविणार्या मानसिकतेतून बाहेर पडावे, जगाची द्वारे आपल्यासाठी खुली आहे, त्यात आत्मविश्वासाने पाय रोवावे, समान न्याय-समान संधी ही तत्वप्रणाली अंगीकारावी. शैक्षणिक उदासिनता झटकून कौशल्यधारक व्यक्ती बनावे. शिक्षणासोबत स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग विद्यार्थ्यांनी स्वीकारावा, असे आवाहन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचाचे अध्यक्ष तथा कला विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा येथील माजी प्राचार्य,डॉ.सुनील आखरे यांनी क्रांतीसूर्य माळी युवा मंडळ द्वारा आयोजित गुणगौरव सोहळा 2023 प्रसंगी विद्यार्थ्यांना केले. ते यवतमाळ येथील कोल्हे सभागृहात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष श्री.निशीकांत थेटे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जोतीबा दीनबंधू कल्याण मंडळाचे अध्यक्ष, अॅड.अरूणराव मेत्रे व सावित्रीआई महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ.माधवी चिंचोळकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरूवातीला दिवंगत डॉ.हरि नरके यांना श्रद्धांजलीपर अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमात 10 वी व 12 वी मधील उच्चश्रेणी प्राप्त विद्यार्थी, मेडीकल, अभियांत्रिकी व विद्यापीठाच्या पदवी-पदव्युत्तर परीक्षेत गौरवास्पद कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, धार्मिक, कला, क्रीडा, नृत्य, नाट्य, अभिनय क्षेत्रातील अभिमानास्पद कामगिरी, विविध पुरस्कार प्राप्त मंडळी, निवड-नियुक्तीधारक मंडळींचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजय येवतकर तथा सूत्रसंचालन प्रा.शशांक केंढे व प्रा.अतुलकुमार सारडे यांनी केले तर आभार श्री.संदिप कोरडे यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी मनोज पाचघरे, महेंद्र पिसे, सुबोध होले,मनोज गोरे, कैलास ढुमणे, गजानन हजारे, तुषार कठाळे, आशिष घोडे, अजय निकोडे, प्रशांत बोराडे, अनंता सारडे, रवि फसाटे, प्रशांत कुबडे, संदिप भांगे, अनन्या थेटे, अथर्व सारडे, कुमार केंढे, यांनी विशेष परिश्रम घेतले. यवतमाळ मधील सावित्रीआई फुले महिला मंडळ, सावित्री शक्तीपीठ, म.फुले सांस्कृतिक मंडळ, सत्यशोधक विद्यापीठ, सत्यशोधक स्टडी सर्कल, सत्यशोधक शिक्षक संघ, माळी बहु.विकास संस्था, माळी महासंघ, अ.भा.समता परिषद, सावतामाळी पतसंस्था, म.फुले अर्बन बँक या सर्व संघटनांनी गुणगौरव सोहळ्याला सहकार्य केले, असे संयोजक अतुलकुमार सारडे यांनी कळविले आहे.

Copyright ©