यवतमाळ राजकीय

शहरातील खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन मनसेचा प्रशासनाला इशारा

शहरातील खड्डे बुजवा अन्यथा तीव्र आंदोलन मनसेचा प्रशासनाला इशारा

( मनसेचा प्रशासनाला इशारा, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात केले वृक्षारोपण)

यवतमाळ शहरात खड्डे चे खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती यवतमाळच्या प्रत्येक रस्त्यावर निर्माण झालेली आहे याच अनुषंगाने मा राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते राजूभाऊ उंबरकर , मनसे जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार , शहर अध्यक्ष अमित बदनोरे यांच्या मार्गदर्शना खाली मनसेच्या वतीने एक अनोख्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाला जागे करण्याचे काम आजच्या आंदोलनातून करण्यात आलेले आहे. शहरातील खड्डेमय रस्त्यात वृक्ष लावून मनसे पडलेले खड्डे किती जीव घेणे आहे हे प्रशासनाच्या निदर्शनात मनसे पदाधिकाऱ्यांनी आणून देत प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालया जवळ व यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या निवास स्थाना जवळील तसेच शहरातील विविध ठिकाणी खड्ड्यात वृक्षा रोपण करुन निर्लज्य प्रशासनाचा निषेध करण्यात आला शहरातील. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी झाली नाही तर भविष्यात मनसे तीव्र आंदोलन करेल आणि अश्या निर्लज्य प्रशासनाला वठणीवर आणल्या शिवाय यवतमाळ शहर खड्डे मुक्त केल्या शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही असे वक्तव्य अभिजीत नानवटकर महाराष्ट्र नवनिर्माण विधार्थी सेना यवतमाळ , यांनी आंदोलनावेळी व्यक्त केले या प्रसंगी गौरव दरणे म न वी से , निखिल बोक्से म न वी से , यवतमाळ शहर उपाध्यक्ष प्रथमेश पाटील , ऋषिकेश हळदे , सागर झपाटे , श्रावण गायकवाड, यश शिंगारे , साईराम कवाडे , अमितेश आडे , संदीप मडावी , दर्शन नानवरे , अंजेश कालंकार ,श्रेयस पांडे यांच्या सह यवतमाळ शहरातील मनसे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Copyright ©