यवतमाळ सामाजिक

यवतमाळच्या ६६ स्केटिंग खेळाडूचा विक्रम

यवतमाळच्या ६६ स्केटिंग खेळाडूचा विक्रम

सलग पाच तास स्केटिंग :

एशिया पॉसिफिक, नॅशनल , इस्टीम रेकॉर्ड मध्ये नोंद

स्वातंत्र्य दिनानिमित्त दि . १५ ऑगष्ट रोजी यवतमाळ जय स्कोटिंग क्लबच्यावतीने येथील नवजिवान मंगल कार्यलय येथे ६६ स्केटिंग खेळाडूंनी सलग पाच तास स्केटिंग करत नवा विक्रम प्रस्थापित केला . या विक्रमाची नोंद एशिया पॅसिफिक रेकॉर्ड , नॅशनल रेकॉड , इस्टीम रेकॉड , मध्ये झाली आहे .

या रेकॉर्डची सुरुवात दुपारी दोन वाजता इरफान इ . मलनस ( अध्यक्ष – अंतराष्ट्रीय मानव अधिकार फेडरेशन ) व अमोल माळकर ( कार्यकारी अधिकारी घाटंजी शहर ) यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखऊन सुरु झाली .

या सलग पाच तास स्केटिग झाल्यानंतर रात्री ७ वाजता या रेकॉडी समाप्ती झाली .

एशिया पॅसिफिक रेकॉडचे ऑफिशियल ऑब्झरर्व्हर निखिल चंडक, प्रियंका चंडक, केतन शिंदे , यांच्या हस्ते सदर तीन रेकॉर्डचे प्रमाणपत्र संघतनेस प्रदान करण्यात आले. या वेळी श्रीमती अनिता रासकर, ( वीनादेवी दर्डा शाळेच्या प्राचार्य ) इरफान इ. मलनस ( अध्यक्ष – अंतराष्ट्रीय मानव अधिकार फेडरेशन ) डॉ . हर्षल राठोड , अभय दुधाटे सर , आशीष जयसिंगपूरे , सुधिर साखरकर स्केटिंग प्रशिक्षक प्रविण दिघाडे महिला स्केटिंग प्रशिक्षका वंदना दिघाडे यांच्या हस्ते मुलांना मेडल तसेच प्रमाणपत्र देण्यात आली. सदर विक्रम पाहण्यासाठी खेळाडू व पालक उपस्थित होते .

हा विक्रम यवतमाळ जिल्ह्यातील प्रथमच झाले असून सर्वत्र खेळाडूवर कौतुकांचा वर्षाव होत आहे .

Copyright ©