यवतमाळ सामाजिक

कृषी विद्यार्थ्यांनी ईपिक पाहणी आणि पिक विमा योजनेबद्दल केली जनजागृती

कृषी विद्यार्थ्यांनी ईपिक पाहणी आणि पिक विमा योजनेबद्दल केली जनजागृती

यवतमाळ– डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नीत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील सातव्या- सत्राचे कृषी विद्यार्थी रुतिक पर्बत, चेतन धोटे, महेश पांडे , लोभस गोरडे, अखिलेश वर्हेकर, प्रतिकेश चिकटे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कापरा येथे शेतकऱ्यांना माहिती दिली की यावर्षी १ रुपयात पीकविमा असल्याकारणे मोठ्या प्रमाणात विमा भरला गेला आहे पण त्याचबरोबर तुम्ही ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे तुम्ही पीकविमा भरताना जे पिक नोंदविले आहे तेच पिक ई पिक पाहणीत नोंदविले असायला हवे तरच तुम्हाला पिक विम्याचा लाभ घेता येईल. यासाठी ई पिक पाहणी करणे जरुरीचे आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आपण कोणती पिके घेतली आहेत ती हंगाम निहाय वेगळी आहेत, सद्यस्थितीत बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे तर काही ठिकाणी कसलाच पाऊस नाही अशावेळी हंगाम असाच जातो कि काय याची चिंता शेतकऱ्याला वाटते आहे अशावेळी विम्याचं कवच करून घेणे गरजेचे आहे आणि यावर्षी १ रुपयात पीकविमा असल्याकारणे मोठ्या प्रमाणात विमा भरला गेला आहे पण त्याचबरोबर तुम्ही ई पिक पाहणी करणे गरजेचे आहे तुम्ही पीकविमा भरताना जे पिक नोंदविले आहे तेच पिक ई पिक पाहणीत नोंदविले असायला हवे तरच तुम्हाला पिक विम्याचा लाभ घेता येईल. यासाठी ई पिक पाहणी करणे जरुरीचे आहे व याबाबत माहिती पोहचवली .यासाठी कृषी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही .कडू, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. वि. महानुर , विषयतज्ञ प्रा. ए. एस. ढेंगळे प्रा. पी.चोपकर या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी गावाचे सरपंच मा श्री गणपतजी ढोले, उपसरपंच मोहन तराळे ग्रामसेवक किशोर जीवतोडे ,सहदेव पांडे,नामदेव हिवाळे, नामदेव मेटकर

कचरू शंभरकर, या शेतकऱ्यानी उपस्थिती नोंदविली

Copyright ©