यवतमाळ सामाजिक

स्वांतंत्र्य दिनी रक्तदान शिबीर व डॉ.गवार्लेज पाईल्स किट चे उद्घाटन 

स्वांतंत्र्य दिनी रक्तदान शिबीर व डॉ.गवार्लेज पाईल्स किट चे उद्घाटन 

यवतमाळ १५ ऑगस्ट शासकीय रक्तपेढी, शैलेश करिहर मित्र परिवार, गवार्ले पाईल्स हॉस्पीटल व यवतमाळ येथील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शिवशक्ती लॉन्स येथे रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबीरात गवार्ले हॉस्पीटल कडुन मोफत रक्ताची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. गवार्ले हॉस्पीटलच्या संचालिका डॉ.अंजली गवार्ले यांनी मुळव्याध, भगंदर, फिशर इ. गुदभागाच्या विकारासाठी तयार केलेली आयुर्वेदिक औषधीची “पाईल्स किट” चे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले. हे उद्घाटन प्रमुख पाहुणे तहसीलदार डॉ .योगेश देशमुख तसेच डॉ.संजय रत्नपारखी, अध्यक्ष (आय.एम.ए.), डॉ.दिनेश चांडक, अध्यक्ष (एन.आय.एम.ए.), डॉ.सुमित छत्ताणी, अध्यक्ष (आय.डी.ए.), श्री.संजय आत्राम (क्राईम ब्राँच), श्रीमती शैलाताई मिर्झापुरे, सौ.किर्ती राऊत, श्री.शैलेश करीहर, श्रीमती उषाताई दिवटे, श्री.विजय बुंदेला तसेच सर्व सामाजिक संस्थांच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.पी.एस.चव्हाण सर यांनी या “पाईल्स किटच्या” उद्घाटनासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ.अंजली गवार्ले ह्या यवतमाळच्या सुप्रसिध्द मुळव्याध भगंदर तज्ञ आहेत व वैद्यकिय क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. आयुर्वेदीय क्षारसुत्र चिकित्सेकरीता त्यांचे इंडीया बुक ऑफ रेकॉर्डला नामांकन झाले आहे. तरी मुळव्याध, भगंदर, फिशर इ. आजारासाठी गर्भिणी स्त्रीया तसेच लहान मुलांमध्ये होणाऱ्या गुदभागातील विकारासांठी हि आयुर्वेदिक औषधीची किट गवार्ले हॉस्पीटल अंजनेय सोसायटी, यवतमाळ येथे उपलब्ध आहे.

डॉ.मनोज बरलोटा, डॉ.ज्ञानेश्वर पुनसे, डॉ.विनोद दुद्दलवार, डॉ.आनंद बोरा, डॉ.शैलेश यादव, डॉ.सुमित शेंडे, डॉ.प्रविण राखुंडे, डॉ.मनिष सदावर्ते, डॉ.संजय अंबाडेकर, डॉ.मंगेश हातगावकर, डॉ.आदित्य अढाऊकर, सौ.विद्याताई खडसे (जिजाऊ ब्रिगेड), सौ.प्रतिभा खसाळे महिला पतंजली, सौ.साक्षी उत्तरवार, सौ.किशोरी उपलेंचवार, सौ.प्रतिभा पवार, सौ.वर्षा चौधरी, सौ.प्रविणा ढोले, सौ.अबोली डिक्कर, सौ.अमृता येरावार, सौ.भावनाताई लेडे, सौ.वर्षा पडवे, सौ.सुनिता भितकर, सौ.पुनम जयपुरीया, सौ.निलीमा मंत्री, सौ.वर्षा मोकाशे, कु.स्नेहल चव्हाण, सौ.माधुरी भोयर इत्यादी पाईल्स किटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होत्या.

Copyright ©