यवतमाळ सामाजिक

रक्तदान शिबिरात जपले यवतमाळकरांनी ऋणानुबंध

रक्तदान शिबिरात जपले यवतमाळकरांनी ऋणानुबंध

रक्तदान शिबिरातून घडले नवं नाते

शेकडोंचे रक्तदान : स्वातंत्र्यदिनी भव्‍य रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

यवतमाळ : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे आता वावगे ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी एस के. ऑटोडिल व मित्र परिवार, तसेच विविध सामाजिक संस्था च्या वतीने स्वातंत्र्यदिनी चला रक्तदान करुया नात नव घडवूया! या उपक्रमांतर्गत भव्‍य रक्तदान शिबिर शिवशक्तीलॉन स्टेट बँक चौक येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 92 युवक-युवती, नागरिकांनी सहभाग घेवून रक्तदान करून गरजू रुग्णाचे जिवन वाचविण्याचा संकल्प घेतला. यापुढेही भविष्यात गरजेच्या ठिकाणी नक्की रक्तदान करू असा संकल्प 100 सहभागी रक्तदात्यांनी केले. या शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, अनिमिया या विषयी आरोग्य मार्गदर्शन डॉ. अंजली गवार्ले यांनी केले. हे शिबिर एस. के. ऑटो डिल यवतमाळ व मित्र परिवार संयोजक शैलेश करीहार यांच्या मार्गदर्शनात आयोजित केले होते.प्रारंभी हिंदू मुस्लिम सिख इसई बुध्द जैन बांधवान सह दामपती नि रक्तदानाने सुरुवात केली..

दरम्यानतहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी केले मार्गदर्शन

रक्तदानामुळे लोकांचे प्राण वाचतातच, याशिवाय रक्तदात्यासही त्याचे आरोग्य सदृढ राहण्याचे फायदे मिळतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, रक्तसंक्रमणामुळे बर्‍याच लोकांचे व रुग्णांचे प्राण वाचू शकतात, परंतु बहुतेक वेळा रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना योग्य रक्तगट मिळणे तसेच रक्त सहजपणे पडताळून देणे कठीण होते. त्यामुळे रक्तदानास जिवनदान असेही म्हटल्या जाते. प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्‍य समजून रक्तदान करावे, असे आवाहन कर्तव्‍यदक्ष तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन व्यक्त केले. अशा शिबिराची उज्ज्वल भविष्यासाठी नितांत गरज आहे, असे म्हणत आयोजकांच्या कौतुक देखील त्यांनी केले. अनेक तज्ञ पदाधिकारी, पुढारी, राजकीय नेते, अधिकारी, कर्मचारी वर्गाने शिबिरस्थळी भेट देत मार्गदर्शन करुन सामाजिक संस्था, संघटनांच्या या कार्याची प्रशंसा केली.

या रक्तदान शिबिरात

निस्वार्थ सेवा फाऊंडेशन, कुलमुखतार महाराणी येसुबाई सामाजिक संस्था, यवतमाळ , श्री. हनुमान मंदीर, गणेश चौक, यवतमाळ, निकी चव्हाण फ्रेन्डस् ग्रुप, प्रज्वल सेवा फाऊंडेशन जिजाऊ फाउंडेशन , माँ दुर्गा उत्सव मंडळ जय विजयचौक कमलादेवी तेजु फाऊंडेशन, कस्तुरी शेपींग., , श्री. हनुमान मंदीर समिती, हनुमान आखाडा , अखिल भारतीय मारवाडी युवा मंच मारवाडी महिला मिडटाउन आखिल भारतीय मारवाडी महिला सम्मलेन, कलाकुंज बहुउदेशिय महिला मंडळ, इनरव्हील क्लब ऑफ ज्वेल्स्, सखी समर्पण, यवतमाळ, उडान फाऊंडेशन.इंडीयन डेन्टल असोसिएसन, य, महावीर युथ फाऊंडेशन, , प्रियाज नर्सरी, बालाजी दुर्गा मंडळ, बालाजी चौक, , रोटरी इनरव्हील क्लब ऑफ यवतमाळ, नॅशनल इंटीग्रेटेड मेडीकल असोसिएशन, यवतमाळ मॉम्स् क्लब, इंडियन मेडीकल असोसिएशन, , महिला पतंजली, व वाघाडी येथील पूरग्रस्त युवक आदींनी यशस्वीतेसाठी पुढाकार घेत सहभाग नोंदविला.

Copyright ©