Breaking News यवतमाळ

शेतात लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

शेतात लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू

लाडखेड पोलीस स्टेशन अंतर्गत वरुड (इजारा) येथील राजेश पकाश टिपरे. रा वरुड इजारा. वय 35 यांना लाइनचा स्पर्श झाल्याने याचा मृत्यू झाला. हि घटना १४ ऑगस्ट रात्री १० वाजता च्या दरम्यान श्रीकृष्ण तुकाराम बुचके याचा शेतांत मध्ये घडली बूचके यांनी वन्य प्राण्यांच्या स्वरक्षणा करीता शेताच्या सभोवताल विद्युत प्रवाह सोडण्यात आला होता राजेश प्रकाश टिपरे व शंकर भगवान दाभेकर हे दोघेही शेतात फेर फटका मारण्यासाठी गेले होते शेतात फिरणे झाल्यावर घरी परत येताना श्रीकृष्ण बुचके यांना शेतात करंट हे माहीत नसल्याने राजेश हा विद्युत तारेवर गेला यातच त्याचा मृत्यू झाला ही घटना प्रत्यक्ष दर्शी शंकर यांनी घरी येऊन सांगितलं व १५ ऑगस्ट ला या प्रकरणी लाडखेड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असता पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे राजेश याच्या मागे दोन मुलं एक मुलगी पत्नी असा आप्त परिवार आहे.

Copyright ©