यवतमाळ शैक्षणिक

बरबडा येथील शेतकऱ्यांना वीज प्रक्रिये बाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक

बरबडा येथील शेतकऱ्यांना वीज प्रक्रिये बाबत मार्गदर्शन व प्रात्यक्षिक

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ,अकोला सलग्नित मारोतराव वादफडे कृषी महाविद्यालय ,यवतमाळ येथील सातव्या सत्राचे कृषी विद्यार्थीनी तनया दरणे, योगेश्वरी डोंगरकर साक्षी नांदेकर ,अर्पिता खिरटकर, साक्षी जेनेकर आणि यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव या कार्यक्रमांतर्गत बरबडा येथील शेतकऱ्यांना बीज प्रक्रिये बाबत प्रात्यक्षिक दिले बियाणांवर रायझोबियम (जैविक खत) व ट्रायकोडर्मा ( बुरशीनाशक ) यांची बीज प्रक्रिया केली आणि त्याबाबतची सर्व प्रक्रिया प्रात्यक्षिक कृपे करून दाखविले १. रायझोबियम चे फायदे. -पिकांना नत्राची उपलब्धता करून देतात. – झाडांची मुळे जोमाने वाढतात.-रासायनिक खतांची मात्रा कमी करण्यास मदत होते.-पिकांची जमिनीतील अन्नद्रव्य खेचून घेण्याची क्षमता वाढते. २. ट्रायकोडर्मा चे फायदे.-रोगकारक बुरशींचा नायनाट होतो. -ट्रायकोडर्मा या बुरशींची बीज प्रक्रिया केल्यामुळे उगवण शक्ती वाढण्यास मदत होते. – जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत होते. हे प्रात्यक्षिक करताना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .ए. ठाकरे ,उपप्राचार्य. एम .व्ही .कडू ,कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. व्ही.महानूर ,विषय तज्ञ प्रा. ए. देऊळकर व प्रा.के.टी. ठाकरे या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी गावातील शेतकरी लखन बोरकर ,कैलास देसाई, राजू राऊत ,गोविंदा कुत्तरमारे, भोला देसाई, शुभम कुत्तरमारे, अक्षय बोरकर, अंकुश देसाई, प्यारेलाल पातालबंसी, गजानन राऊत, बाबाराव राऊत या शेतकऱ्यांनी उपस्थिती दाखवून सहकार्य केले.

Copyright ©