यवतमाळ सामाजिक

नाकाबंदी करून पकडला तांदळाचा ट्रक

वर्धा जिल्हा प्रतिनिधी  पंकज तडस

नाकाबंदी करून पकडला तांदळाचा ट्रक

जिल्हातील शिंदी रेल्वे पोलीस स्टेशन अंतर्गत गुप्त माहीती आधारे सिंदी रेल्वे पोलिसांनी समृद्धी महामार्गावर नाकाबंदी करुन ट्रक क्रमांक एम. एच. ४० सि डी ६७०९ या वाहनास थाबवुन विचारपुस केली असता. वाहन चालक पवन चारमोडे याने वाहनात चना असल्याचे सागुन चन्याचे बिल दाखविले. मात्र वाहनाची तपासणी केली असता वाहनात चुगड्यात तांदुळ भरुन मिळुन आल्याने वाहन चालकास तांदूळा बाबत विचापुस केली असता तांदूळा बाबत कोणत्याही प्रकारचे कागदपत्र सादर केले नाही़.

या घटना क्रमावरून सदर आरोपी ट्रक चालक व ट्रक ताब्यात घेतला असता ट्रक मध्ये ६४४ थैली मध्ये २५७ क्विंटल तांदूळ एकुन किमत ९,२५,२००, व ट्रक किमत २५,००,००० असा एकुन ३४,२५,२०० रुपयाचा माल मिळुन आला असुन पोलीस स्टेशन सिदी रेल्वे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास तपास शिंदी रेल्वे पोलीस स्टेशन चे ठाणेदार वंदना सोनुने करीत आहे.

Copyright ©