यवतमाळ सामाजिक

गोंडेगाव येथे कृषी महाविद्यालय तर्फे जनावराचे लसीकरण

गोंडेगाव येथे कृषी महाविद्यालय तर्फे जनावराचे लसीकरण

दारव्हा: तालुक्यातील गोंडेगाव येथे पशुवैद्यकीय चिकित्सालय अंतर्गत पशुधन पर्यवेक्षक डॉ. स्मिता देवकते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडेगाव येथील लसीकरण कृषी महाविद्यालय दारव्हा तर्फे लंपि या विषाणूमुळे होणाऱ्या रोगाविरोधात प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात गावातील जवळपास एकूण शंभर ते दीडशे जनावरांचे लसीकरण करण्यात आले.सदर शिबिरात पशुसेवक सेवदाता सतीश अणे. तुषार राठोड. तसेच कृषीकन्या काजल हाडके.साक्षी ढेरे.श्रुती ढूणढुणे. नंदिनी दिघाडे.वैष्णवी घाटे. व पशुपालक ऋषिकेश लोहकरे. यांनी परिश्रम घेतले व तसेच कार्यक्रमाचे उपस्थित स्नेहल चेतन लोहकरे सरपंचा. संजय उघडे पोलीस पाटील.व गावातील इतर शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

यासाठी विद्यार्थ्यांनीना कृषी महाविद्यालयाचे प्रा.पंकज खाडे. व विषय तज्ञ प्रा. तुषार मस्के. व उपक्रम क्रमाचे अधिकारी प्रा. वि.यू देशमुख. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Copyright ©