यवतमाळ सामाजिक

‘’कापरा” येथे ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पेरणीपूर्व बीजप्रक्रिया मोहिम”

‘’कापरा” येथे ग्रामीण व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पेरणीपूर्व बीजप्रक्रिया मोहिम”

यवतमाळ– डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नीत मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ येथील सातव्या- सत्राचे कृषी विद्यार्थी रुतिक पर्बत, चेतन धोटे, महेश पांडे , लोभस गोरडे, अखिलेश वर्हेकर, प्रतिकेश चिकटे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कापरा येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले कि शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया कशी व कोणत्या पिकास करावी, बिजप्रक्रियेचे महत्व व उत्पादन वाढीस होणाऱ्या फायद्यांबाबत प्रात्याक्षिक करून सटिक व सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यात आले. बियानांवर ट्रायकोडर्मा ,जिब्रेलिक एसिड व किटकनाशकाची बिजप्रक्रिया केली व पेरणिपूर्व बिजप्रक्रियेची पद्धत व प्रक्रिया प्रात्याक्षिक करून दाखवण्यात आले.

पेरणी पूर्व बीजप्रक्रीया, प्रात्यक्षिकास कृषी महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.आर. ए. ठाकरे, उपप्राचार्य एम. व्ही .कडू, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. वि. महानुर , विषयतज्ञ प्रा. ए. पी. देऊळकर, डॉ.पी.एन . बोबडे या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी गावाचे सरपंच मा श्री गणपतजी ढोले, उपसरपंच मोहन तराणे ग्रामसेवक किशोर जिवतोडे व अनिल गायकी, गोपाल फुकरे, विक्की डेहनकर, गोलु गायकवाड, गणेश भरबडे- सचिन मरसकोल्हे व जगदीश तराळे या शेतकऱ्यानी उपस्थिती नोंदविली व उपयुक्त माहिती घेतली.

Copyright ©