यवतमाळ सामाजिक

गण्या दिसला, घुंगरूही वाजले शांतीनगरात रात्रीस खेळ चाले अंधश्रद्धा निर्मुलनाची गरज अमित कांबळे 

गण्या दिसला, घुंगरूही वाजले शांतीनगरात रात्रीस खेळ चाले अंधश्रद्धा निर्मुलनाची गरज

प्रतिनिधी,: अमित कांबळे 

यवतमाळ : भ्रमाने मनात रुंजी घातली की चमत्कारिक गोष्टी दिसायला लागतात. असाच काहीसा प्रकार

जादूईनगर म्हणून प्रसिद्धीस असलेल्या शांतीनगरात नुकताच घडला.मयत गणेश ऊर्फ ड्रग्स हा प्रत्यक्षात दिसल्याची चर्चा गावात वाऱ्यासारखी पसरली तर रात्री बाराच्या सुमारास अनेकांना घुंगराचा आवाजही ऐकू येतो,अशा चर्चांनी आता ठेका धरला आहे. हा सर्व प्रकार मध्यरात्री होत असल्याने इथल्या भटकत्या आत्मांचा रात्रीस खेळ चालतो, असा अजब दावा काहीजण करत आहेत.

जादूटोणा,तंत्र-मंत्र,भूत पिशाच, काला जादू,खाण्यात देणे, करणी, चकवा, बाहेरचं लावणे,मुंजा,गुप्तधन,भानामती,

भूतबाधा अशा रंजक बाबींचा शांतीनगरावर आधीपासूनच विशेष पगडा राहिला आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी इथल्या काही नगरवासियांच्या मनावर या रंजक गोष्टींचे पुर्विपार गारूड राहिले आहे. यातूनच काही दिवसांपूर्वी आत्महत्या करणारा गण्या काहींना अचानक दिसतो. स्मशानभूमीच्या भिंतीवरून तो उडी काय मारतो. रात्री त्याच्यासोबत अन्य भटकत्या आत्म्यांची स्मशानात मैफिल काय भरते तिथे मुजरा होतो आणि नर्तकीच्या पायातील घुंगराचा आवाज स्पष्टपणे घरापर्यंत ऐकू येतो, अशा उलटसुलट चर्चा सध्या जोर धरत आहे. हा फक्त मनाचा खेळ असून तुमच्या मनातील भ्रमातून हेसर्व जाणवत असल्याचे काहींचे म्हणणे आहे तर या दाव्याला साफ खोटे ठरवत दावेदारांना खुले आव्हान देणाऱ्यांचाही एक गट सक्रिय आहे. या घटनेतून काहींच्या मनातले भय अधिकच वाढत जात आहे तर काहींसाठी हे भययुक्त वातावरण मनोरंजन करणारे ठरत आहे.

येथे तातडीने अंधश्रध्दा निर्मूलनाचा कार्यक्रम घेण्याची गरज असल्याचे काही सुज्ञ व्यक्तींकडून सुचविले जाते तर यांना थेट चॅलेंज करणारे त्यांच्या या वक्तव्याला बालिशपणा समजून त्यांनाच मुर्खात काढत आहेत.एकंदरीत या दाव्या-प्रतिदाव्यात या घटनांमागचे सत्य अंधारातच दडले जाईल,याची भीती आहे. त्यातून या भागात अंधश्रध्देला अधिकच वाव मिळण्याची शक्यता दिसत आहे.

अंधारातली आत्मा लवकरच उजेडात

आमच्या नगरात हा विषय नवीन नाही. खास करून

अमावस्या -पौर्णिमेला चक्रावून टाकणारी एखादी घटना कानावर येतेच.

मग ती घटना ज्या पद्धतीने रंगवून आणि अतिआत्मविश्वासाने

सांगितली जाते,त्यावर कधीकधी विश्वासही बसतो. काही दिवसांपूर्वी टाचण्या लावलेला लिंबू आणि बाहुली आढळून आल्यानेही खळबळ उडाली होती.आता या आत्महत्यांच्या घटना आणि त्यास जोडला जाणारा अर्थ अनाकलनीय आहे.

स्मशानभूमीमध्ये गर्द काळोखात नाचणाऱ्या त्या नर्तक आत्मेचा आम्ही लवकरच छडा लावणार आहोत.

– करण पाईकराव,स्थानिक रहिवासी,शांतीनगर.

स्मशानाभूमीत आत्म्यांचा मुजरा ?

शांतीनगरात काही दिवसांपूर्वी एका पाठोपाठ तीन आत्महत्यांच्या घटना उजेडात आल्या त्यानंतर आजारपणातून दोघांचा मृत्यू झाला तर गत पंधरवड्यात शेजारच्या नगरातील एका गवंडी मजुरानेही आत्महत्येचे पाऊल उचलले.या घटनेनंतर शांतीनगरात पुन्हा तर्कवितर्क लावले जात आहे.काहींच्या मते

यापैकी तीन मृतकांनी सोबत गवंडी काम केले त्यामुळे मृत्यूपश्चात त्यांची वर आकाशात भेट होत असेल या भेटीदरम्यान स्मशानात त्यांनी नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला असावा आणि यातूनच तेआपली हौस भागवत असल्याचेही म्हटले जात आहे. स्मशानभूमीची भिंत पडल्याने येथूनच या आत्मा बाहेर भटकत आहे. त्यांची जर का शांती करायची असेल तर बोकड्याचा बळी द्यावा लागतो, अशा चर्चांनाही यापूर्वी उधाण आले होते.

Copyright ©