यवतमाळ सामाजिक

स्व. मोहित राजेंद्र झोटिंग स्मृतिदिनानिमित्त सर्वरोग निदान, उपचार व रक्तदान शिबिर

स्व. मोहित राजेंद्र झोटिंग स्मृतिदिनानिमित्त सर्वरोग निदान, उपचार व रक्तदान शिबिर

वडकी येथे स्व. मोहित राजेंद्र झोटींग यांचे स्मृतिदिनानिमित्त दत्तकृपा बहुउद्देशीय संस्था वडकी व आचार्य विनोबाभावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) वर्धा यांच्या सयुंक्त विद्यमाने वडकी येथील स्माल वंडर ‘कान्व्हेंटच्या आवारात भव्य मोफत सर्वरोग निदान उपचार व रक्तदान शिबिर संपन्न झाले.

या मोफत सर्वरोग निदान आहे. उपचार व रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनय मुनोत सामाजिक कार्यकर्ते, शिबीराचे उद्घाटक अमित भोईटे तहसिलदार, प्रमुख उपस्थिती केशव पवार गटविकास अधिकारी, शैलेश बेलेकर सरपंच ग्रा.पं. वडकी, प्राचार्य मंजूषा सागर, वसंत वाघ, गंभिरराव भोयर, बी.एन. पोटे मंडळ अधिकारी, ज्ञानेश्वरराव चौधरी सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी वडकी परिसरातील सर्व महीला, पुरुष

रुग्नांनी आपली शरीराची मोफत तपासणी करून उपचार घेतले. तसेच वडकी परीसरातील अनेक युवक नागरिकांनी रक्तदान केले. यावेळी अमित भोईटे तहसीलदार व केशव पवार गटविकास अधिकारी यांनी स्व. मोहित राजेंद्र झोटिंग यांच्या देहदान केलेला • असला तरी आज मोहित शरीराने नसला तरी आत्म्याने आपल्या शिबिरात असल्याचे जाणिव होत आहे.विनय मूनोत यांनी अध्यक्षीय भाषणात अवयवदान, देहदानाचे महत्व सांगून राजेंद्र झोटींग यांनी मुलांच्या स्मृती जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असून नागरिकांनी आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा व यृवकांनी रक्तदानदानात सहभाग नोंदवावा असे सांगितले,

आज मोहितच्या आईवडिलांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे असे काम मोहित चे आईवडिल करीत आहे आहे मनोगत केशव पवार गटविकास अधिकारी पं. स. राळेगाव यांनी व्यक्त केले. तर अमित भोईटे तहसीलदार राळेगाव यांनी आपल्या आरोग्य निरोगी ठेवले पाहिजे, पैसा, सपंत्ती बंगला ही आपली खरी सपंत्ती नसून आपले आरोग्य हे निरोगी असणे हीच खरी आपली संपत्ती आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन हीप्रा. अभिजीत डाखोरे, प्रास्तावित डॉ.पंकज टापरे व आभार सतीश सावंत यांनी मानले

रक्तदानात अँड वैभव पंडीत, डॉ पंकज टापरे, प्रशांत अहिरकर, संकेत मोरे, प्रविण महाजन, अमोल गौळकर,अतुल दांडेकर,राजेश भेदूरकर,अनूप सोनटक्के,आयुष भोयर, शुभम झोटींग, अमित कूबडे, निलेश डवरे,प्रविन खेवले,कीसना ऊईके, पत्रकार दिपक पवार, पत्रकार रोमहर्षल फुटाणे,नरेश कोहाड,सिध्दार्थ पाटील, आशिष झोटींग, श्रीपाद जौजाळ,अनुप सोनटक्के, भास्कर पाटील,शुभम मडावी,सुरज खैरे, गणेश कीन्नाके, यांनी रक्तदानात सहभाग नोंदविला.

शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रकाश चिव्हाणे, दिलीप बागंरे, देवेंद्र झीले, प्रशांत अहिरकर,जिवण गोहकार, अतूल दांडेकर,राजेश भोयर,गजानन कोल्हे, शंकर जोगी,भास्कर पाटील,आशिष झोटींग,किसना ऊईके, सिध्दार्थ पाटील शुभम झोटींग,मनोज तामगाडगे,राहुल वडपल्लीवार,सह स्मॉलवंडर कान्व्हेट सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले

Copyright ©