यवतमाळ सामाजिक

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” साजरा

प्रतिनिधी बाभुळगाव

भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” साजरा

स्थानिय भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालयात शनिवार, दि. 12 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांची 132 वी जयंती “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस” म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपक कोटुरवार यांनी पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे जीवन व कार्य ह्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. संजय शेणमारे यांनी केले. नंतर ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन ह्यांचे जीवन, कार्यावर आधारित माहितीपट एल.सी.डी.प्रोजेक्टरवर उपस्थितांना दाखविण्यात आला. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. सुधिर त्रिकांडे, प्रा. डॉ. गजानन माने ह्यांनी प्रसंगानुरूप वाचनसंस्कृती व सद्यस्थिती ह्यावर यथोचित मार्गदर्शन केले. व्यासपीठावर महाविद्यालय गुणवत्ता नियंत्रण कक्ष प्रमूख प्रा. डॉ. निलेश सुलभेवार, ग्रंथालय सल्लागार समिती सदस्य प्रा. डॉ. वामन विरखेडे, प्रा. डॉ. कल्पना कोरडे, प्रा. सुनिल ईश्वर हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रतिभा काळमेघ यांनी तर आभाप्रदर्शन प्रा. डॉ. विकास टोणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता ग्रंथालय सहाय्यक श्री. गजानन पाचकवडे, श्री. मधुकर जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी वृंद, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ आणि आजी-माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Copyright ©