यवतमाळ सामाजिक

चला रक्तदान करुया नात नव घडवूया! स्वातंत्र्यदिनी भव्‍य रक्तदान शिबिर

चला रक्तदान करुया नात नव घडवूया! स्वातंत्र्यदिनी भव्‍य रक्तदान शिबिर

यवतमाळ : रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. रक्तदानामुळे लाखों लोकांना जीवनदान मिळते, त्यामुळे रक्तदान हे जीवनदान असे म्हणणे आता वावगे ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनी एस के. ऑटोडिल व मित्र परिवार, तसेच विविध सामाजिक संस्था च्या वतीने स्वातंत्र्यदिनी चला रक्तदान करुया नात नव घडवूया! या उपक्रमांतर्गत भव्‍य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जनतेने आपले प्रामाणिक कर्तव्‍य समजून रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

हे शिबिर येथील शिवशक्तीलॉन स्टेट बँक चौक येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात हिमोग्लोबिन तपासणी, अनिमिया या विषयी आरोग्य मार्गदर्शन डॉ. अंजली गवार्ले करणार आहेत. अधिक माहितीसाठी एस. के. ऑटो डिल यवतमाळ व मित्र परिवार संयोजक शैलेश करीहार यांचेशी संपर्क करावा

या सामाजिक संघटनांचा राहणार सहभाग

यवतमाळ ब्लड डोनर्स असोसिएशन, इनरव्‍हील क्लब ऑफ ज्वेल्स, सखी समर्पण यवतमाळ, माहेश्वरी महिला मंडळ, वसुंधरा फाउंडेशन, टीडब्ल्यूजे फाउंडेशन, माउली अर्बन, अभा मारवाडी महिला मिडटाऊन, निस्वार्थ सेवा फाउंडेशन, हनुमान मंदिर गणेश चौक, जयहिंद दुर्गा उत्सव मंडळ, महाराणी यशूबाई सामाजिक संस्था, प्रिया नर्सरी, विक्की चव्‍हाण फ्रेंडस ग्रुप, प्रज्वल सेवा फाउंडेशन, यवतमाळ का राजा सेवा, मॉ दुर्गा उत्सव मंडळ जयविजय चौक, कमलदेवी तेजू,, कस्तुरी मंच, हनुमान मंदिर समिती, कलाकुंज बहुउद्देशीय संस्था, महावीर युथ फाउंडेशन यवतमाळ इंडियन डेंटल असोसिएशन यवतमाळ उडान महिला मंच यवतमाळ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी आर्य वैश्य महिला मंडळ यवतमाळ बालाजी दुर्गा मंडळ यवतमाळ आदी सामाजिक संघटना सहभाग नोंदविणार आहेत.

Copyright ©