यवतमाळ सामाजिक

घाट किन्ही येथे किड रोगा्ंचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन

 

दारव्हा चेतन पवार

घाट किन्ही येथे किड रोगा्ंचे व्यवस्थापनावर मार्गदर्शन

दारव्हा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ दारव्हा द्वारे संचालित ‘ग्रामिण जागरूकता कार्यानुभव अंतर्गत कृषी दुता कडून घाट किन्ही येथे किड व रोगांचे एकीकृत व्यवस्थापनावर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.पिकांवर येणारे किड व रोग त्याचे लक्षणे व परिणाम आणि नियंत्रणाचे उपाय यावर सविस्तर माहिती प्रात्यक्षिक द्वारे देण्यात आली. तसेच निंबोळी अर्क कसा तयार करावा व त्याची फवारणी पिकांवर केल्यावर होणारे फायदे याबाबत माहीती सांगण्यात आली. सदर कार्यक्रमास, कृषीदुत पंकज पाकधने, नचिकेत पिपंळशेंडे,तेजस निंबोकार , ज्ञानदीप मोहरकर,यश मेश्राम व गावातील शेतकरी गण उपस्थित होते. यासाठी त्यांना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.ए. खाडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.वि.यु. देशमुख, विषय तज्ञ प्रा. एस.मनवर सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Copyright ©