Breaking News यवतमाळ सामाजिक

*दोन भावंडांच्या मारामारीत एक गंभीर*

 

हिवरी वन परिक्षेत्रात दोन बिबट्याच्या लढाईत एक बिबट गंभीर
प्रतिनिधी
यवतमाळ तालुक्या अंतर्गत येणाऱ्या सायखेडा येथील जंगलात एका बिबट्यांनी दुसऱ्या बिबट्यावर हल्ला करून गभिर जख्मी केले हा प्रकार सायखेडा येथील एका गुराख्यानी बघितला आणि त्याने गावकऱ्यांना सांगताच गावात चर्चेला उधाण आले याची माहिती वनविभागाला देण्यात आली या बरोबरच यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण चे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण,रुपेश नेवारे घटना स्थळी पोहचले सोबतच वनविभागाने याची दखल घेत हिवरी येथे आणण्यात आले प्राथमिक उपचारा नंतर त्या वाघास नागपूर येथे हलविण्यात आल्याची माहिती यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी दिली हि बाब गुराख्याच्या लक्षात आली नसती तर त्या वाघाचा मृत्यू होऊन त्याची विल्हेवाट लावली असती कारण अनेक घटना हिवरी वण परिसरात अनेक घटना घडत आहे खुले आम वन्यप्राण्यांची शिकार,सागवान चोरी,होत असताना वनविभागाचे एकही अधिकारी वनरक्षक,चौकीदार वणात फिरत नाही सर्व घरूनच आपला कारभार पाहात असून जंगलाचा विनाश होत आहे ज्या ठिकाणी कामे आहे त्याच ठिकाणी एखादा वनरक्षक आपल्या स्वार्था पायी काम पहातो मात्र कुणीही या ठिकाणी उपस्थित दिसत नाही याची वरिष्ठांनी दखल घेऊन संबंधी कर्मच्याऱ्याना मुख्यालयी राहण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी केल्या जात आहे.

Copyright ©