यवतमाळ सामाजिक

लिंगायत समाज ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

लिंगायत समाज ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

(वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठान चा उपक्रम)

वीरशैव हितसंवर्धक मंडळ यवतमाळ,आणि वसुधा प्रतिष्ठान,यवतमाळ यांचे वतीने समाजातील ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच गुणगौरव सोहळा बसवेश्वर भवन येथे संपन्न झाला. समाजातील ज्येष्ठ नागरिक यांच्या बद्दल कृतज्ञतेची भावना जोपासत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्याकरिता वीरशैव हितसंवर्धक मंडळ यवतमाळ व वसुधा प्रतिष्ठान यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न झाला. समाजातील ज्येष्ठ नागरिक व इयत्ता दहावी व बारावी त्यासोबतच उच्च शिक्षण प्राप्त करून ध्येयापर्यंत मजल गाठणारी विद्यार्थी त्या सोबतच विशेष नैपुण्य प्राप्त करणारे विद्यार्थी यांचा गुणगौरव शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यवतमाळ वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर उमरे हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कारागृह यवतमाळ येथील तुरुंग अधिकारी माधव खैरगे आणि पांढरकवडा लिंगायत समाजाचे सचिव प्रमोद पंचभाई,लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्षा , सौ शिल्पा बेगडे,हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष जयेश हातगावकर यांनी आपले विचार मांडले. जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही संघर्षा मधूनच जीवन घडविल्या जाऊ शकते असे विचार तुरुंग अधिकारी माधव खैरगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले समाजातील बहुसंख्य विद्यार्थी, पालक, महिला मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते. जीवनात खरे यश मिळवायचे असेल तर विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त भावना याची जाणीव असणे हे फार महत्त्वाचे आहे असे मत प्रमोद पंचभाई प्रमुख पाहुणे यांनी आपले विचार व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना जिद्द चिकाटी व प्रेरणा प्राप्त होण्याचे एक साधन समाजामधून प्राप्त होते असे विचार डॉ. जयेश हातगावकर यांनी व्यक्त केले. ह्या कार्यक्रमा मध्ये राजेंद्र मेनकुदळे ह्यांनी शिष्यवृत्ती करिता पन्नास हजार रूपये मंडळाला दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले, तसेच गरजु विद्यार्थांनी शिष्यवृत्ती करिता संपर्क करावा असे सांगण्यात आले,कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव निलेश शेटे यांनी केले तसेच लिंगायत वधू वर परिचय मेळाव्याच्या वेबसाईट बद्दल माहिती दिली व सर्व मान्यवरांच्या हस्ते वेबसाईट चे रीतसर उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण तंबाखे यांनी केले आभार प्रदर्शन निलेश शेटे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.जयेश हातगांवकर,डॉ किशोर मांडगावकर,गिरीष गाढवे, गजानन हातगावकर, नागेश कुल्ली, विनोद नारिंगे,बाळासाहेब दिवे,सुरेश शेटे, जयंत डोंगरे, रमेश केळकर,प्रदिप उमरे,भुषण तंबाखे, विनोद देशमुख, राजु कुर्हेकार,

सौ कल्पना देशमुख,सौ.पद्मश्री हातगांवकर, सौ उज्वला नारिंगे, सौ.उषा कोचे,सौ.सिमा केळकर, सौ.तेजश्री मानेकर,सौ.सारिका उमरे, सौ.स्वाती हातगांवकर आदींनी परिश्रम घेतले

Copyright ©