यवतमाळ सामाजिक

आदर्श शिक्षण महाविद्यालय , यवतमाळ येथे ‘व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

आदर्श शिक्षण महाविद्यालय , यवतमाळ येथे ‘व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

स्थानिक आदर्श महाविद्यालय, यवतमाळ येथे दिनांक 09/ 08/2023 वार गुरुवार रोजी व्यक्तिमत्व विकास आणि आत्मविश्वास या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.डॉ. निता राऊत उपस्थित होत्या. तर कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. सुचिता डेरे उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्रा.डॉ. सुचिता ढेरे यांनी आपल्या वक्तव्यामध्ये आजच्या स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करणे आज गरजेचे आहे. वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे विद्यार्थी नवनवीन गोष्टी आत्मसात करित असतो. नवनवीन छंद जोपासणे गरजेचे आहे. आज आदर या शब्दाला प्रचंड महत्व प्राप्त झालेले आहे जर तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर दिला तर आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक वेगळीच भर पडत असते. अशाप्रकारे विविध उदाहरणे देऊन मॅडमनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रा.डॉ. निता राऊत यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास हा असायला हवा. आपल्या गुणांची आपल्याला पारख हवीच पण ओव्हर कॉन्फिडंट राहू नका. त्यात तुमचे नुकसान आहे. मात्र स्वतःला दुर्लक्षित करू नका अन्यथा तुमच्या मध्ये गट्स असतानाही तुम्ही स्पर्धेच्या बाहेर फेकले जाल अशा प्रकारचे मार्गदर्शन मॅडमनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. डॉ.मनिषा क्षीरसागर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता कांचन मॅडम, प्रिया मॅडम, तेजस सर यांचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाकरिता एकूण 45 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

Copyright ©