यवतमाळ सामाजिक

जागतिक आदिवासी दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी यवतमाळ
जागतिक आदिवासी दीना निमित्त भगवान बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले,तर विविध भागात आदिवासी समाज उपयोगी योजना आदिवासी बांद्धवा पर्यंत पोहचविण्याचे काम सुरू करण्यात आले त्या योजना आदिवासी समजाणा मिळाव्या या करिता सतत कार्यशील राहून त्यांच्या मुलांना सिक्षणा विषयी येणाऱ्या अडचणी कशा प्रकारे दूर करता येईल व प्रत्येकानी शिक्षण घेऊन इतरांना शिक्षणाची ओढ कशी निर्माण करता येईल या करिता नियोजन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे तसेच आ.मदनभाऊ येरावार यांच्या माध्यमातून हिवरी येथे आदिवासी समाज भवन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले
यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष श्यामभाऊ जयस्वाल, विधानसभा प्रभारी बाळासाहेब शिंदे,तालुकाध्यक्ष चिंतामण पायघन, एसटी बँकेचे संचालक नानाभाऊ बोनगीनवार, प्रमोद गांडोळे पाटिल, भवरे ,दिनेश पवार,महेंद्र अगलधरे ,आदी उपस्थित होते,

Copyright ©