Breaking News यवतमाळ

प्रधान बोरी येथील सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू

प्रधान बोरी येथील सर्पदंश झाल्याने महिलेचा मृत्यू

येथील जवळच असलेल्या प्रधान बोरी येथे आपल्या राहत्या घरी महिलेल्या महिलेला विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली मृतक महिला कविता आकाश कुळसंगे वय 30 वर्ष ही महिला घरी काम करत असताना दुपारी बारा वाजता च्या दरम्यान घरामध्ये जात असताना अचानक सापाने चावा घेतला ही बाब आजूबाजूला माहिती होताच जवळच असलेल्या मेटीखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये दाखल करण्यात आले परंतु प्रथम उपचार करून तिला यवतमाळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना तिचां वाटेतच मृत्यू झाला तिच्या मागे पती व तीन मुले आहे प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य सुविधा मिळाली असती तर या महिलेचे प्राण वाचले असते परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत सापावर, किंवा इतर विषारी किड्यांवर उपचार होत नाही इतर आरोग्य केंद्रात कुठेही उपचार होत नसल्याची खंत अनेकांनी व्यक्त करून दाखवली प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ग्रामस्थांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्या अशी मागणी जनतेकडून होत आहे जर उपकेंद्र सर्वसामान्यांचे प्राण वाचवत नसेल तर शासनाने अयोग्य पैसा खर्च करू नये असाही सल्ला जनतेकडून देण्यात येत आहे.

Copyright ©