यवतमाळ राजकीय

पूरग्रस्त पांढरी गावाला शासकीय मदत त्वरित देण्यात यावी – लाला राऊत

पूरग्रस्त पांढरी गावाला शासकीय मदत त्वरित देण्यात यावी – लाला राऊत

शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदार यांना निवेदन

यवतमाळ शहराच्या जवळ असलेले नगर परिषद हद्दीतील पांढरी हे गाव शासनाच्या सानूग्रह अनुदान मदतीपासून वंचित राहिले आहे 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मुळे या गावातील अनेक घरात पाणी घुसले अनेक घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जीवनावश्यक वस्तू, कपडे, धान्य, आधीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान येथे झाले आहे परंतु इथे आज पर्यंत तलाठी यांनी जाऊन पंचनामे सुद्धा केले नाही,इथल्या गावकऱ्यांना आता पर्यंत कोणतीही शासकीय मदत मिळाली नाही, गावातील काही नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल देशमुख यांना फोन वरून त्यांचा गावातील पूरपरिस्थिती ची माहिती सांगितली,त्या माहिती वरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष लाला राऊत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर,प्रफुल्ल देशमुख,किशोर नरांजे, लुंगे, महेंद्र अडसड, यांनी पांढरी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली,आणि नुकसान ग्रस्त कुटुंबाचे नावे घेऊन तहसीलदार यवतमाळ यांना झालेल्या नुकसानग्रस्ताची कुटुंबाची यादी आणि सानुग्रह अनुदान मिळण्याबाबत चे निवेदन तहसीलदार दिले यावेळी लाला राऊत शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यवतमाळ , योगेश धानोरकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, प्रफुल्ल देशमुख , किशोर नरांजे, तन्मय त्रिवेदी शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस,अमन चौधरी जिल्हा उपाध्यक्ष, नयन लुंगे,महेंद्र अडसड,अमित नारसे,आकाश चंदनखेडे आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकार्ये उपस्थित होते.

Copyright ©