यवतमाळ सामाजिक

संसर्गजन्य आजारणे दगावलेल्या प्राण्यांसाठी साठी स्मशानभूमी व वाहनाची व्यवस्था देण्याची मागणी

संसर्गजन्य आजारणे दगावलेल्या प्राण्यांसाठी साठी स्मशानभूमी व वाहनाची व्यवस्था देण्याची मागणी

संसर्गजन्य आजारणे दगावलेल्या प्राण्यान करिता स्मशानभूमी व वाहनाची व्यवस्था देण्याची मागणी

मा.जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना सर्व सेवाभावी संस्था, कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन चर्चा केली जिल्हाधिकारीचा सकारात्मक प्रतिसाद

मागील काही वर्षा पासून विविध संसर्ग जन्य आजाराची लागण मोकाट व पाळीव प्राण्यांना झाली. यात मुख्यत: केनाईन डिस्टेम्पर, पारव्हो,गेस्ट्रो, लंपी, H5N1 सारख्या संसर्गजन्य आजाराने मृत झालेली प्राण्यांची व्हिलेवाट लावन्याकरिता नगर परिषद यवतमाळ च्या कचरा गाडीत उचलून वनालगत असलेल्या डम्पिंग वर डम्प केली जातात. यामुळे वन्यप्राण्यांना या आजराची लागण होण्याची श्यक्यता नकारता येणार नाही. आपल्या यवतमाळ शहरा मध्ये अल्प प्रमाणात नोंद असली तरी असे इतर राज्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्याची बातम्या वृत्तपत्रातून प्रसारीत झालेल्या आहेत.

यात केनाईन डिस्टेम्पर संसर्ग ने 34 सिंह व 6 बीबट, दोंड (पुणे) 6 कोल्ही, 2000 मोकाट/पाळीव कुत्री अमरावती दगावली. लंपी संसर्गाने राजस्थान 1,75,0000, महाराष्ट्र 27727 गायवर्गातील पशुधन मृत्युंमुखी पडल्याची नोंद आहे.

कचरा संकलित करते वेळी कचरा गाडीतील ही मृत जनावरे घरोघरी फिरत असतात. या मुळे व्हायारस मयुटेशन ची सम्भावना बनते…

संसर्गने मृत झालेल्या मोकाट /पाळीव प्राणी पुरण्यासाठी स्मशानभूमी व मृत जनावर ने /आन करण्यासाठी वेगळ्या निर्जंतुकीकरण व्यवस्था असणाऱ्या वाहणाची व्यवस्था असावी.

भविष्यात होणारी मोठी हानी टाळण्याकरिता सविनय प्राण्यांची स्मशान भूमी व वाहणाची मागणी दत्ताभाऊ कुळकर्णी (माजी नगरसेवक), राहुल दाभाडकर, संकेत लांबट( निस्वार्थ सेवा फाऊंडेशन) अनिकेत नवरे( निस्वार्थ सेवा फाऊंडेशन), किशोर बाभुळकर(निस्वार्थ सेवा फाऊंडेशन), अमोल व्होरा (Be -kind पशुमित्र ), अभिजीत गुल्हाने (Be -kind पशुमित्र ), अनिल तांबेकर (संकल्प फाउंडेशन), विजय बुंदेला, दिनेश तिवाडे( जाणीव फाउंडेशन ) अमोल फुंदे (धैर्य फाउंडेशन), कमलेश बघेल (धैर्य फाउंडेशन) यांच्या हस्ते निवेदनाद्वारे करण्यात आली

Copyright ©