Breaking News यवतमाळ

पट्टेदार वाघाचा शिरकाव ग्रामस्थांना वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

पट्टेदार वाघाचा शिरकाव ग्रामस्थांना वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

जोडमोहा वनपरिक्षेत्र हद्दीतील मेटीखेडा, गांधीनगर शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य असलेल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूर यांनी सावधता बाळगण्याचा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी जोडमोहा यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केला आहे.

पंधरा दिवसांच्या कालावधीत जंगलात चरायला गेलेल्या एका म्हाशिवर जीवघेणा हल्ला तर तीन गाई ठार केल्याच्या घटना घडल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजूरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर वाघाचा शोध घेण्यासाठी जंगली परिसरात ट्रॅप कॅमेरा बसविन्यात आले आहे,वनविभागाने परिसरातील लोकांना खबरदारी घेण्यासाठी म्हणुन सतर्कता पत्रक काढून खालील उपाय सांगितले आहे.

एकट्या व्यक्तीने जंगली परिसरात जाऊनये, शेतात सकाळी आठ वाजण्याच्या आधी जवूनये तर सायंकाळी पाच वाजल्यानंतर थांबु नये, रात्र पाळीला शेतात कामे असल्यास शेकोटी पेटवावी, शेतात एकट्याने काम करू नये, शेतात ये,जा करतांना आवाज करणारी उपकरणे वापरावी , हिंस्त्र/धोकादायक वन्यप्राणी दिसल्यास आजूबाजूच्या लोकांना आवाज देवून सतर्क करावे, वन्यप्राणी दडून राहत असेल अशा शंखाजनक झाडाजवळ जातांना अधीक विशेष सावधानी बाळगावी, हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या जंगली परिसरात गुऱ्हे चारण्याकरिता एकट्या व्यक्तीने जवूनये,हिंस्त्र वन्य प्राण्याने गाय, बैल किवा म्हशीची शिकार केल्यास त्यांना शिकार सेवन करू दयावी सदर ठिकाणावर गर्दी करू नये, हिंस्त्र वन्यप्राणी आढळल्यास किवा हल्ल्याची घटना भून घडल्याचे निदर्शनास आल्यास त्यांनी त्वरित वनवीभाग कर्मचाऱ्यांना कळवावे, अशा आशयाचे

प्रसिद्धी पत्रक काढून वनविभागाने सतर्कता जनजागृती केली आहे.

Copyright ©