यवतमाळ सामाजिक

तलाठी,मंडळ अधिकाऱ्याचां प्रताप पूरग्रस्तांचे पंचे नामे केले,मात्र सानुग्रह निधी मधून डावलले!

तलाठी,मंडळ अधिकाऱ्याचां प्रताप पूरग्रस्तांचे पंचे नामे केले,मात्र सानुग्रह निधी मधून डावलले!

तलाठ्यांच्या व मंडळ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा मुळे जोडमोहा येथील पूरग्रस्त नागरिक राहणार का? मदतीपासून वंचित

गेल्या महिन्यात संपूर्ण यवतमाळ जिल्हात ढगफुटी होउन संपूर्ण जिल्हात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पूरपरिस्थती पाहून राज्यशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत जाहिर केली होती मात्र जोडमोहा या गावी सव्वीस तारखेच्या मध्यरात्रीपासून अतिवृष्टी होऊन अनेक नागरीकांच्या घरात पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले होते.यात संसार उपयोगी वस्तू पूर्ण वाहून गेल्या तर काही निकामी झाल्या अनेकांना प्रशासनाने पूरग्रस्तांचे स्तलांतरही केले येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी तालुका महसूल प्रशासनाकडून नायब तहसीलदार आनंद बोबडे,मंडळ अधिकारी सतीश गढीकर व तलाठी दिपाली हर्षे यांनी येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे केले या पूरग्रस्त भागात एकूण ३५ ते ४० घरात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते मात्र तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी शासनाकडे घरचा आहेर दिला त्यानी प्रशासना कडे कुठलेही नुकसान न झाल्याचा अहवाल पाठवल्याचे बोलेले जात आहे पूरग्रस्त नागरिकांना शासनाच्या मदती पासुन वंचित ठेवन्याचे राजकीय सलोख्यातून षडयंत्र होत तर नाही ना !असा संशय वेक्त करण्यात येत या प्रकरणी नुकसान ग्रस्त नागरिका मध्ये प्रचंड रोष निर्माण होत आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांवर दफ्तर दिरंगाई केल्या मुळे कारवाई करण्यात यावी व यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

पूरग्रस्त अन्याय संदर्भात

पत्रकार शक्तिच्या संपादक यांनी विचारना केली असता पुरा मुळे नागरीकांच्या घरात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते व आपण स्वतः पंचनामा करुन सुद्धा शासनाकडून कुठलीच मदत का? मिळाली नाही.अशी विचारणा केली असता

मंडळ अधिकारी व तलाठी यांनी दिलेले एक सारखे उत्तर – नदी काठी असलेल्या नागरीकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आणि निघून गेले असा जावई शोध या अधिकाऱ्यांनी लावला त्या मुळे मदत मिळणार नाही असे उत्तर देत आपली जबादारी झटकून दिली.या प्रकरणी तातडीने दखल घेऊन याची पुनः पूरग्रस्तांच्या पाहणी करून तात्काळ मदत देण्यात यावी अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करू असा इशारा पूरग्रस्तांना दिला आहे.

Copyright ©