यवतमाळ सामाजिक

शेतकऱ्यांनो, ई-पीक ॲप वर नोंदणी करा

शेतकऱ्यांनो, ई-पीक ॲप वर नोंदणी करा

खरीप हंगाम २०२३ पिक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.

खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही. पिक विमा, नाफेड, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिकाला हमीभाव, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती सारख्या विविध शासकीय योजनांच्या लाभांकरीता ईपीक पाहणी अत्यावश्यक आहे. तरी आजच शेतकऱ्यांनी स्वतः बांधावर जावून मोबाईलद्वारे ई पीक पाहणी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन तहसिलदार घाटंजी यांच्याद्वारे करण्यात येत आहे.

Copyright ©