Breaking News यवतमाळ

मुसळ येथील विद्यार्थ्याचा मृत्यु

मुसळ येथील विद्यार्थ्याचा मृत्यु

येथुन जवळच असलेल्या मुसळ (कुसळ)येथील ईयत्ता अकरावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा

मृत्यु झाल्याची घटना दिनांक ३ ऑगष्ट रोजी घडली.

प्रथमेश गुणवंत कुडमथे (१७) असे मृतक विद्यार्थ्याचे नाव आहे, तो डोंगरखर्डा येथील गुरुदेव विद्यामंदिर कला, कनिष्ठ महाविद्यालयात इयता ११वी मध्ये शिक्षण घेत होता.

मृतक प्रथमेशला ३ऑगष्ट रोजी सकाळ पासुन अचानक पोट दुखीचा त्रास सुरू झाला त्याला लगेच प्राथमिक आरोग्य केंद्र मेटीखेडा येथे खासगी वाहनाने नेत असताना काहीवेळातच त्याच्या छातीत असह्य त्रास व्हायला लागला त्याची गंभीर प्रकृती पाहून मेटीखेडा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी त्याला जिल्हा रुग्णालयात रवानगी करण्याचा सल्ला दिला मात्र जिल्हा रुग्णालयात पोहचताच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अत्यंत मनमिळावू, शांतस्वभाव म्हणुन गावात ओळख असलेला प्रथमेश अचानक निघुन गेल्याच्या दुःखद घटनेने मुसळ गावात दुःखाचे वातावरण होते.

Copyright ©