यवतमाळ सामाजिक

अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात रक्कम जमा,रास्ता रोको आंदोलन स्थगित !

सावळी सदोबा प्रतिनिधी आशिफ खान

अखेर पूरग्रस्तांच्या खात्यात रक्कम जमा,रास्ता रोको आंदोलन स्थगित !

सावळी सदोबा व परिसरात पैनगंगा, अडाण ,अरुणावती या तीन नद्या वाहतात तर सोबतच अनेक छोटे-मोठे नालेही वाहतात.

जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा आलेल्या महापुराने अनेक घरांची पडझड झाली, अनेक घरात पुराचे पाणी शिरले अशा सर्व नुकसान व पूरग्रस्तांना ज्यांची घरे पुराणे क्षतिग्रस्त झाली अशांना दोन दिवसात मदत देण्यात यावी अन्यथा ४ ऑगस्ट शुक्रवार ला सावळी सदोबा येथे रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तंवर यांनी आर्णी तहसीलदार यांना लेखी पत्राद्वारे दिला होता.

दिनांक ३ ऑगस्टला दुपारी २ वाजता आर्णी तहसीलदार श्री. परशराम भोसले साहेब यांनी लेखी पत्राद्वारे श्री. मुबारक तंवर यांना कळविले ज्यांच्या घरात पूराचे पाणी गेले व ज्यांच्या घरांची पडझड झाली अशा सर्व घरांचे पंचनामे झाले ,

ज्यांची घरे क्षतिग्रस्त व नुकसानग्रस्त झालेली अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे लेखी पत्र मुबारक तंवर यांना देऊन ४ ऑगस्ट शुक्रवारचे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्याची पत्रातून विनंती केल्याने श्री. मुबारक तंवर यांनी ४ ऑगस्ट रोजी होणारे रस्ता रोको आंदोलन आपण स्थगित करीत असल्याचे सदर प्रतिनिधीला सांगितले.

ज्या मागणीसाठी आपण रास्ता रोको आंदोलन करणार होतो,

ती आपली मागणी मान्य झाल्याचे तहसीलदारांनी स्वतः लेखी पत्र दिल्याने आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे कळविल्याने आपण ४ ऑगस्ट चा रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय मागे घेत आहोत असे यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी सदर प्रतिनिधीला सांगितले.

Copyright ©